3-year-old sister physical assaulted by elder brother Saam Tv
देश विदेश

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Crime news: सितारगंजमधून एक घृणास्पद घटना समोर.१४ वर्षांच्या मुलाने त्याच्या तीन वर्षांच्या चुलत बहिणीवर बलात्कार केला.

Bhagyashree Kamble

  • सितारगंजमधून एक घृणास्पद घटना समोर.

  • १४ वर्षांच्या मुलाने त्याच्या तीन वर्षांच्या चुलत बहिणीवर बलात्कार केला.

  • तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

उत्तराखंडच्या सितारगंजमधून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. १४ वर्षांच्या मुलाने त्याच्या तीन वर्षांच्या चुलत बहिणीवर बलात्कार केला. आरोपी मुलगा पीडित मुलीला धार्मिकस्थळी घेऊन गेला होता. धार्मिक स्थळाच्या संस्थापकाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलाचे कृत्य पाहिले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

ही घटना शनिवारी घडल्याची माहिती आहे. दुपारी धार्मिकस्थळी वस्तू विखुरलेल्या होत्या. धार्मिक स्थळाच्या संस्थापकाने त्या विखुरलेल्या वस्तू पाहिल्या. नंतर सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. फुटेज पाहून त्यांना धक्का बसला. यात एक किशोरवयीन मुलगा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता.

संस्थापकाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. व्हिडिओच्या आधारे आरोपी आणि मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले. पोलिसांनी आरोपी १४ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं. तसेच तीन वर्षांच्या मुलीचाही शोध घेतला.

रविवारी रात्री पोलिसांनी मुलीला तिच्या कुटुंबासह रूग्णालयात पाठवले. तेथे मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "तुला माझ्यासोबत झोपावं लागेल..."; दिग्दर्शकाची प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

DA-DR Hike : सणासुदीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल खूशखबर?; DA वाढीसह 'ही' घोषणा लवकरच, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये स्टेशन मास्तरांवरील हल्ल्यांविरोधात रेल्वे कर्मचारी असोसियन आक्रमक

Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT