Uttarakhand Accident Saam Tv
देश विदेश

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

Uttarakhand Accident: उत्तराखंडमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला.

Priya More

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे मंगळवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव बस पुलावरून खाली कोसळली आणि पाण्यात बुडाली. या भीषण अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. ही घटना बद्रीनाथ महामार्गावरील गुलार बाजारजवळ घडली. अपघाताची घटना घडली त्यावेळी बसमध्ये ३० ते ३५ जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनिकिरेती पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरिद्वारहून चमोलीकडे जाणारी विश्वनाथ सेवेची बस आज सकाळी ऋषिकेशजवळील गुलेर परिसरात पुलावरून कोसळून खोल दरीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत १९ जखमी प्रवाशांना वाचवून एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. प्रशासन, पोलिस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.

एसडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघाताची माहिती मिळताच ब्यासी आणि धलवाला चौक्यांमधील पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी दाखल होत त्यांनी तात्काळ मदत आणि बचावकार्य केले. काही प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा चुराडा झाला. सध्या घटनास्थळी एसडीआरएफ पथके बचावकार्य करत आहेत.

उत्तराखंडमधील आणखी एका रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. रुद्रप्रयागमध्ये एका कारला अपघात झाला. हे सर्वजण एका लग्नाहून परत येत होते. सोमवारी रात्री ९ वाजता हे सर्वजण लग्न सोहळ्यावरून परत येत असताना ही घटना घडली. कार अनियंत्रित होत दरीत कोसळली. या कारमधून १० जण प्रवास करत होते. यातील चौघांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या सहा जणांवर उपचार सुरू आहेत. चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर श्रीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Collection : 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! १२व्या दिवशीही कोट्यवधींची कमाई, रणबीर-यश ८०० कोटींचा आकडा गाठण्यासाठी सज्ज

Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलेलं असताना या 5 ड्रिंक्सचं सेवन म्हणजे जणू विषच; कमी वयातच येईल हार्ट अटॅक

महंत देवेंद्र चैतन्य स्वामींचा संशयास्पद मृत्यू, मंदिराजवळील बारवेत आढळला मोबाईल; नेमकं घडलं काय?

आला हिवाळा, दररोज ही फळं खा! राहाल फिट अँड फाईन आणि त्वचाही पाऱ्यासारखी चमकू लागेल

Maharashtra News Live Update: गोदा घाट विद्रूप करणाऱ्या १२ उत्तर भारतीयांना महापालिकेने केला दंड

SCROLL FOR NEXT