Crime News Saam Tv
देश विदेश

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

Married Woman Killed by Policeman: उत्तरप्रदेशच्या हमीरपूरमध्ये प्रेमसंबंधातून पोलीस निरीक्षकाने विवाहित महिलेची हत्या केली. लोखंडी रॉडने डोक्यात वार करून आरोपीने मृतदेह नग्नावस्थेत फेकून दिला.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील हमीरपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून एका पोलिसानं प्रेयसीची हत्या केली आहे. प्रेयसी विवाहित होती. पतीसोबत झालेल्या मतभेदानंतर महिलेचं पोलिसासोबत प्रेमसंबंध जुळलं. मात्र, पोलिसासोबत झालेल्या भांडणानंतर त्यानं प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करून तिची हत्या केली. हत्येनंतर पोलिसाने मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

महोबा जिल्ह्यातील काब्राई पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी राज बहादुर यांची कन्या किरण देवी हिचा विवाह सीआरपीएफमध्ये तैनात असलेल्या विनोद सिंगसोबत झाला होता. लग्नापासून विनोद आणि किरण यांच्यात खटके उडाले होते. किरणने सासरच्या मंडळींविरोधात हुंडा आणि घरगुती हिंसाचाराचा गु्न्हा दाखल केला.

हे प्रकरण काब्राई पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले निरीक्षक अंकित यादव यांच्याकडे होते. यादरम्यान, अकिंत आणि किरणमध्ये जवळीक वाढली. दोघांमध्ये प्रेम आणि शारीरिक संबंध निर्माण झालं. वृत्तानुसार, १२ नोव्हेंबर रोजी अंकित गाडी उधार घेऊन किरणला घेऊन जाण्यासाठी मौदाहा पोलीस स्टेशन परिसरात आला.

तिथे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेला. पोलीस अधिकाऱ्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. तसेच महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत शेतात फेकून दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासात पोलीस अधिकारी अकिंत आरोपी असल्यातं उघड झालं. या प्रकरणी अंकित यादवला तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंची खळखळ, शाहांचं चव्हाणांनाच बळ? भाजपचं ऑपरेशन लोटस सुरूच राहणार?

Winter Health Care: थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खावे की नाही?

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये ‘नाशिक पॅटर्न’ची धडाकेबाज अंमलबजावणी

Maharashtra Politics: मनसे–ठाकरे गट युतीला वेग; मनसेसाठी किती जागांचा प्रस्ताव? गणित आलं समोर|VIDEO

मालेगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; संतप्त महिलांचा आक्रोश|VIDEO

SCROLL FOR NEXT