उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पोलिस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. योगी सरकारने 15 IAS आणि 23 PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, या संदर्भातील परिपत्रक सरकारने प्रसिद्ध केल आहे. या फेरबदलात खनन सचिव माला श्रीवास्तव यांच्याकडील सचिव पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे आता निदेशक भूतत्व आणि खनिकर्म पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पंचायती राज विभागाचे निदेशक IAS अधिकारी अमित सिंह यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हरिप्रताप शाही यांची निदेशक पंचायती राज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमित सिंह यांच्याकडे प्रबंध निदेशक PCDF पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. IAS अधिकारी राकेश कुमार सिंह यांची अपर आयुक्त, आवास विकास परिषद या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नीरज शुक्ला यांना प्रबंध निदेशक PCF करण्यात आले आहे. IAS अधिकारी डॉ. चंद्र भूषण यांची अपर निदेशक RUPAAM म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ध्रुव खाडिया यांची जौनपूरहून मुख्य विकास अधिकारी, मऊ या पदावर बदली करण्यात आली आहे. विवेक कुमार श्रीवास्तव यांची सदस्य, राजस्व परिषद, प्रयागराज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र बहादुर सिंह यांना जौनपूरचे मुख्य विकास अधिकारी करण्यात आले आहे.
उज्ज्वल कुमार यांची विशेष सचिव, खनन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IAS अधिकारी जे. रीभा यांना एमडी मेडिकल सप्लाई कॉर्पोरेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन कुमार सिंह यांची विशेष सचिव, चिकित्सा शिक्षा, तर प्रकाश बिंदू यांची सचिव, चिकित्सा शिक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अर्चना गहरवार यांची कुलसचिव, AKTU लखनऊ आणि रीना सिंह यांची कुलसचिव, KGMU म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.