Uttar pradesh Saam tv
देश विदेश

Shocking news : सासरा ३ मुलांची आई असलेल्या सुनेला घेऊन पळाला; नवऱ्याने केली मोठी घोषणा, शोधणाऱ्याला २०००० रुपये देणार

Uttar pradesh Shocking news : उत्तर प्रदेशमध्ये सासरा ३ मुलांच्या सुनेला घेऊन पळाल्याची घटना घडलीये. या घटनेने नवऱ्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Vishal Gangurde

सासू-जावई यांची प्रेम प्रकरणे तुम्हाला नवीन नाहीत. आतापर्यंत अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. या प्रकरणांदरम्यान एक अजब प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये चुलत सासऱ्यासोबत सून पळाल्याची घटना घडली आहे. महिला तीन मुलांची आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. महिला घरातील किमती दागिने आणि दोन मुलींना घेऊन पळाली आहे. या घटनेने इटावा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित नवऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पीडित नवऱ्याने पत्नीची शोधाशोध सुरु केली. पत्नीचा शोध घेण्यासाठी नवऱ्याने पोलिसांत धाव घेतली. मात्र, अद्याप पत्नीचा शोध लागलेला नाही. त्यानंतर नवऱ्याने मोठी घोषणा केली. नवऱ्याने पत्नीला शोधणाऱ्या व्यक्तीला २०००० रुपये बक्षीस देणार असल्याची घोषणा केली. पीडित नवरा कार चालवून कुटुंबाचं उदरनिर्वाह करतो. नवरा मागील महिन्यात म्हणजे ३ एप्रिल रोजी कानपूरला गेला होता.

पीडित नवऱ्याने सांगितलं की, 'मी कानपूरहून घरी आलो. त्यावेळी घरात पत्नी आणि दोन मुली नव्हत्या. काही वेळाने समजलं की, नात्याने काका लागणाऱ्या व्यक्तीसोबत पत्नी पळाली. पत्नीने मुलाला घरातच सोडलं. तिने घरातील चार अंगठ्या, एक हार, मंगळसूत्र आणि ५० हजार रुपये घेऊन फरार झाली'. या प्रकारानंतर पीडित नवऱ्याने तीन एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान, पीडित नवऱ्याने पोलिसांत बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी बायकोला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. पीडित नवरा हा तीन एप्रिलपासून बायकोला शोधत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'पीडित व्यक्तीच्या बायकोला शोधण्यासाठी पोलिसांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच महिला आणि तिच्या सासऱ्याचा शोध लागेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT