Snake Saam Tv News
देश विदेश

Snake Attack: पती-पत्नी झोपले होते, अचानक मध्ये आला साप; पुष्पाचा जीव गेला

Woman dies due to snake bite in bed: एका सापामुळे आनंदी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बेडवर झोपलेल्या पती- पत्नीच्यामध्ये साप आला आणि फणा काढत महिलेला डसला.

Bhagyashree Kamble

एका सापामुळे आनंदी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बेडवर झोपलेल्या पती- पत्नीच्यामध्ये साप आला आणि फणा काढत महिलेला डसला. यात महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या महोबात घडली आहे.

सकाळी पती लवकर उठला. तेव्हा पत्नी वेदनेनं तडफडत पडली असल्याचं पाहिलं. त्याच ठिकाणी साप देखील होता. महिलेला तातडीनं रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय महिलेच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. मृत महिलेचं नाव पुष्पा आहे. तर, तिच्या पतीचं नाव प्रमोद आहे. दोघांचाही सुखी संसार सुरू होता. पण एका सापामुळे त्यांचा संसार उद्धवस्त झाला आहे.

पती प्रमोद सांगतो की, रात्री जेवण केल्यानंतर पत्नी पुष्पा आणि प्रमोद खोलीत गेले. बेडवर दोघेही झोपले. दरम्यान, त्यांच्या पलंगावर साप आला. दोघेही गाढ झोपेत असल्यामुळे साप कुठून, कधी आणि कसा आला, याची माहिती नाही. साप रात्रभर बेडच्या ठिकाणी फणा काढत फिरत होता.

पहाटे अचानक पत्नीला साप दिसला. ती जोरात किंचाळली. तेव्हा पत्नीला सापाने चावले होते. पत्नीची किंचाळी एकून पती खडबडून जागा झाला. त्यानं जवळच सापाला पाहिलं. पत्नी वेदनेनं विव्हळत होती. पतीने तातडीनं पत्नीला रूग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलं आणि शवविच्छेदनासाठी दिले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT