वृत्तसंस्था: सध्या उत्तर प्रदेश येथे विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh) सुरू आहे. १० फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीमध्ये काही टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. यादरम्यानच्या काळामध्ये निवडणुकी संदर्भात अनेक चांगल्या- वाईट घटना समोर येत आहेत. पिलीभीतमध्ये (Pilibhit Uttar Pradesh) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिलीभीत बाजार समितीत (Market Committee) निवडणूक नियंत्रण कक्षाच्या (Control Room) आसपास सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
पिलीभीत निवडणूक (Election) नियंत्रण कक्षात एकूण ५२ सीसीटीव्ही (CCTV ) बसवण्यात आले होते. त्यामध्ये ३४ कॅमेरे (Camera) बिघडल्याचे लक्षात आल्यावर इलेक्शन ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. एखाद्या राजकीय (Political) पक्षाचे नेते किंवा कार्यकर्त्यांचे हे कृत्य असल्याचा संशय सर्व अधिकाऱ्यांना होता. याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली होती. मात्र, तक्रार करण्याअगोदरच या प्रकरणाची चौकशी केली असता, हा कारनामा माकडांनी केल्याचे निदर्शनास आले आहे.
हे देखील पहा-
माकडांच्या एका टोळीने बाजार समितीत तयार केलेल्या नियंत्रण कक्षात घुसून कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीतच्या एडीएमनं (ADM) दिलेल्या माहितीनुसार, बाजार समितीमध्ये तयार केलेल्या निवडणूक नियंत्रण कक्षाबाजूला ५२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एका सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्याची किंमत २ हजार ५०० रुपये इतकी आहे. ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपीएटी (VVPAT) मशीन ठेवण्याकरिता मंडईच्या आवारात स्ट्राँग रूम तयार करण्यात आली आहे. त्या रूमच्या सुरक्षेकरिता हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
माकडांनी या ५२ कॅमेऱ्यांपैकी ३४ कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. या माकडांना बाजार समितीच्या परिसरात दूर ठेवण्याकरिता ३ पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येकी एका टीममध्ये ९ सदस्य आहेत. या टीमने आतापर्यंत ७ माकडे पकडली आहेत. शिवाय गेल्या २४ तासात २५ सुरक्षा कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आली आहे. त्यांचे अजिबात नुकसान झाले नाही, असेही देखील ते यावेळी म्हणाले आहेत. पिलीभीतच्या एडीएमने दिलेल्या माहितीनुसार, खराब झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि कॉर्डच्या सुरक्षेकरिता त्यावर ग्रीस लावण्यात आले आहे. जेणेकरून माकडे ते खराब करू शकणार नाही. मंडई परिसरातील निवडणूक नियंत्रण कक्ष आणि स्ट्राँग रूमच्या जवळच्या भागात तैनात असलेल्या वनविभागाच्या (Forest Department) पथक प्रमुखांनी दिलेल्या माहिती की, उपपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे प्रत्येक पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय एक वन निरीक्षक (Forest Inspector) आणि वनरक्षक देखील (Forest Gaurd) त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याबरोबर इतर ६ वन कर्मचाऱ्यांनाही ड्युटीवर ठेवण्यात आले आहे.
माकडांना मंडईच्या आवारापासून बाजूला ठेवणे आणि त्यांना पकडून जंगलामध्ये सोडण्याची जबाबदारी या टीमकडे देण्यात आली आहे. आता वनविभागाचे कर्मचारी या उपद्रवी माकडांना कंट्रोल रूमपासून दूर ठेवण्यात यशस्वी होणार की नाही, हे पुढील काही दिवसात दिसून येणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.