रोहिदास घाडगे
पुणे: नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे येडगाव, भोरवाडी ता जुन्नर जि पुणे गावच्या (village) हद्दीमधील सुवर्ण पॅलेस लाॅजच्या बाजुला राहत असलेल्या विदया सचिन कदम पहाटे ४: ३० वाजेच्या सुमारास मुलगा झोपेत असताना राहत्या घरी आपला मुलगा राज सचिन कदम (वय-१३) वर्षे यास परकरच्या नाडीने गळा आवळला आहे. यामध्येच त्याचा तडफडुन मृत्यू झाला आहे.
नारायणगाव येथे खाजगी रुग्णालयात (hospital) पुढील उपचारकरिता तिने स्वतः ससुन हॉस्पिटल पुणे (Pune) येथे हलविण्यात आले होते. परंतु, उपचार दरम्यानच त्याचा मयत झाला आहे. या प्रकरणामध्ये विदया कदम हिने ससुन हाॅस्पीटल येथे खोटे कारण सांगुन घडलेली माहीती लपवली आणि मुलाचा अंत्यविधी करण्यास हलविण्यात आला होता. सदर दाखल मयताचे कागदपत्र पोलीस (Police) स्टेशनला प्राप्त झाल्यावर मयताचे प्राथमिक तपास करता आणि कागदाचे अवलोकन करता प्रथम दर्शनी सदर मुलाचा घातपात झाल्याचा संशय आल्याने मयताचे अनुशंघाने विदया कदम हिस चौकशी कामी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे बोलविण्यात आले होते.
हे देखील पहा-
या प्रकरणाची तिला कसून चौकशी केली असता, ती प्रथम उडवा- उडवीची तसेच असमाधानकारक उत्तरे देत होती. तिच्याकडे वारंवार चौकशी (Inquiry) करता तिच्या बोलण्यात विसंगती असल्याचे लक्षात येताच ती काहीतरी माहीती लपवत असल्याचा संशय आल्याने तिच्याकडे सखोल अधिक चौकशी करता तिने मीच माझे मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळुन खुन केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. आरोपी नामे विदया सचिन कदम या महिलेने तिच्या पोटच्या मुलाचा खुना मागची सविस्तर माहीती अशी की, तिला आणि तिच्या प्रियकर दत्तात्रय गोविंद औटी रा. इनाममळा बोरी याला भेटण्यास अडथळा होत असलेला मुलाला पहाटेच्या सुमारास मुलगा झोपेतच असताना परकरच्या नाडीने गळा आवळुन मुलाचा खुन करण्यात आलं आहे.
यानंतर त्याच्या छातीवर प्लास्टीकच्या झाडुने मारहाण (Beating) केली आहे. नंतर त्याची काही हालचाल होत नसल्याने त्यास नारायणगाव येथील श्री हाॅस्पीटल (Hospital) येथे आणले होते. परंतु, डाॅक्टरांनी त्यास पुणे ससुन येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्याला त्याठिकाणी डाॅक्टरांनी मयत घोषित केले आहे. याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात मुलाचे वडिलांनी फिर्याद दिली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.