Beed: धक्कादायक प्रकार! कोरोना मृताचे सानुग्रह अनुदान लाटण्यासाठी काहीही

कोरोना मृतांचे अनुदान मिळविण्यासाठी अनेकांची दावेदारी
Beed: धक्कादायक प्रकार! कोरोना मृताचे सानुग्रह अनुदान लाटण्यासाठी काहीही
Beed: धक्कादायक प्रकार! कोरोना मृताचे सानुग्रह अनुदान लाटण्यासाठी काहीहीविनोद जिरे
Published On

बीड: कोरोनामुळे (Corona) मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना, शासनाकडून (government) 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान (Grants) जाहीर झाल्यानंतर, आता हे अनुदान लाटण्यासाठी, बीडमध्ये (Beed ) अजबचं प्रकार समोर आला आहे. एका कोरोना (Corona) मृत महिलेचे अनुदान मिळावे, म्हणून चक्क तिघांनी दावेदारी केली आहे. जिल्हा रुग्णालय (Hospital) आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून या अर्जाची छाननी केली जात असतांना, हा धक्कादायक प्रकार समोर आला असून नावातील फरक आणि नाते जुळत नसल्याने प्रशासनाने (administration) हे अर्ज नाकारले आहेत. (Anything to get Corona 50 thousand grant in Beed)

हे देखील पहा-

जिल्ह्यात (district) आतापर्यंत अनेकांच्या कुटुंबातील कर्ते पुरुष, महिला आहेत. अनेकांचे आई- वडील दोघेही या कोरोनाने हिरावून घेतले आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2 हजार 968 रुग्णांचा जीव गेला आहे. तर या मृतांच्या कुटुंबीयांनी 50 हजारांच्या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज (Application) करावे लागत आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानंतर यासाठी आतापर्यंत 3 हजार 199 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर यातील 2 हजार 115 अर्ज बरोबर असून पात्र आहेत. तर 1084 आज वेगवेगळ्या कारणाने नाकारले आहेत.

Beed: धक्कादायक प्रकार! कोरोना मृताचे सानुग्रह अनुदान लाटण्यासाठी काहीही
Nagpur Bus Strike: नागपूरमध्ये आपली बससेवेतील कर्मचारी संपावर

दरम्यान यामध्ये 11 मृतांच्या अनुदानासाठी प्रत्येकी १ साठी २ किंवा ३ जणांनी सानुग्रह अनुदानसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांना फोनवरून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे, अशी माहिती आरडीसी संतोष राऊत यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. दरम्यान एका कोरोना मृताच्या अनुदानासाठी अनेकांनी अर्ज केल्याने, अनुदान लाटण्यासाठी काहीही होत असल्याचा प्रकार, बीड जिल्ह्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com