Bagpat Honor Killing News  Saam tv
देश विदेश

Bagpat Honor Killing : बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत आढळली; मुलीच्या बापाने रागाच्या भरात दोघांचा जीव घेतला

Bagpat Honor Killing News : मुलगी बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत आढळली. त्यानंतर मुलीच्या बापाने रागाच्या भरात दोघांचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. बापाने मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलगी बॉयफ्रेंडच्या मिठीत आढळली. त्यानंतर बापाने रागात दोघांचा गळा आवळून जीव घेतल्याची घटना घडली आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपीला अटक केली.

पोलिसांनी आरोपी बापाला अटक केल्यानंतर पोलिसांनी प्रेमी जोडप्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. बागपतच्या बडौत या गावात सकाळच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमाचं नातं होतं. दोघे एकमेकांना लपून छपून भेटायचे. दोघांच्या प्रेमाविषयी संपूर्ण गावाला माहीत होतं. मात्र, तरुणीच्या बापाला माहीत नव्हतं. रविवारी मुलीच्या बापाला दोघांच्या प्रेमाविषयी माहिती दिली. त्यामुळे मुलीच्या बापाने तपासाला सुरुवात केली. एका ठिकाणी दोघेही विचित्र अवस्थेत आढळले. हे दृश्य पाहून मुलीच्या बापाचा पारा चढला. त्यानंतर रागाच्या भरात बापाने दोघांची हत्या केली.

बापाने रागाच्या भरात आधी रश्शीने मुलाचा गळा आवळला. त्यानंतर मुलीचा गळा आवळून दोघांची हत्या केली. दोघांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. बघता बघता घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. दोघांच्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपी बाप पुष्पेंद्र (५०) याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

दोघांच्या हत्येनंतर गावात पोलिसांचा मौठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांच्या चौकशीत दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरु होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तरीही तरुण आणि तरुणी एकमेकांना भेटायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT