Businessman Wife and 4-Year-Old Daughter Saam TV News
देश विदेश

प्रेमविवाह, ३६ पानांची सुसाईड नोट... व्यावसायिकानं पत्नी अन् लेकीसह आयुष्य संपवलं, नेमकं कारण काय?

Businessman Wife and 4-Year-Old Daughter: शाहजहांपूरमधील दुर्गा एन्क्लेव्ह येथे करोडपती व्यावसायिक सचिन ग्रोव्हरनं पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली. पत्नी शिवांगीनं आईला ३६ पानांची सुसाईड नोट व्हॉट्सअॅपवर पाठवली होती.

Bhagyashree Kamble

  • शाहजहांपूरमधील दुर्गा एन्क्लेव्ह येथे करोडपती व्यावसायिक सचिन ग्रोव्हरनं पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली.

  • पत्नी शिवांगीनं आईला ३६ पानांची सुसाईड नोट व्हॉट्सअॅपवर पाठवली होती.

  • आर्थिक समस्या आणि कर्ज हा आत्महत्येचा मुख्य कारण असल्याचा उल्लेख.

  • या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ३५ वर्षीय करोडपती व्यासायिकानं पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली आहे. ही बातमी शहरात पसरताच खळबळ उडाली आहे. हे भयानक पाऊल उचलण्यापूर्वी सचिनच्या पत्नीनं तिच्या आईला व्हॉट्सअॅपवर ३६ पानांची सुसाईड नोट पाठवली होती. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.

ही धक्कादायक घटना शाहजहांपूरच्या दुर्गा एन्क्लेव्हमध्ये घडली आहे. सचिन आपल्या कुटुंबासह या परिसरात राहत होता. सचिनच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. सचिन त्याच्या आई आणि दोन भावांसह राहत होता. तो एक करोडपती व्यावसायिक होता. ८ वर्षांपूर्वी त्यानं प्रेयसी शिवांगीसोबत प्रेमविवाह केला होता.

सचिनचे दोन भाऊ रोहित आणि गौरव यांचेही लग्न झाले होते. घटनेच्या दिवशी बुधवारी सचिनच्या रूममधून कोणताही आवाज येत नव्हता. त्यानंतर कुटुंबाने त्यांच्या खोलीत धाव घेतली. तसेच खोलीचा दरवाजा तोडला. शिवांगीचा मृतदेह बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर, सचिनचा मृतदेह दुसऱ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत होता.

तर, त्यांच्या ४ वर्षांच्या मुलीचाही मृतदेह त्यांच्यासोबत आढळला. कुटुंबाने तिघांनाही तातडीने रूग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मृत्यूपूर्वी शिवांगीने तिच्या आईला व्हॉट्सअॅपवर ३६ पानांची सुसाईड नोट पाठवली. यात तिनं आर्थिक समस्या आणि कर्जाबद्दल उल्लेख केला आहे.

व्यावसायिक सचिनची वहिनी ज्योती म्हणाली, मंगळवारी सायंकाळी आम्ही बाजारातून परत आलो. तेव्हा सचिन आणि त्याची बायको मुलीसोबोत खेळत होती. त्यांच्या चेहऱ्यावर स्ट्रेस नव्हते. त्यांनी माझ्याकडे मोबाईल चार्जर मागितला. पण अचानक त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजलं. तिघांच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे'. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT