Uttar Pradesh Road Accident: उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील कांठ रोडवर ऊसाच्या ट्रॅक्टरची आणि बसची जोरदार धडक झाली. लदावली गावाजवळ सकाळी हा अपघात झाला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. ऊसाची ट्रॅक्टर-ट्रॉली आणि रोडवेज बस यांच्यात अपघात झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह पोस्टमार्टमसाठी मुरादाबादच्या रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
सकाळी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली कारखान्याकडे निघाली होती. त्याचवेळी रोडवेजच्या बसची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात आई आणि मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मुरादाबाद डेपोची बस बिजनोरच्या दिशेने जात होती. लडावली गावाजवळ बस पोहोचताच उसाने भरलेल्या एका ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक बसली. या अपघातात अर्चना, तिचा मुलगा सुशांत (रा. सादुपुरा छजलात), लोकेंद्र (रा. नूरपूर बिजनौर) आणि दीपिका चौहान यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघात झाल्यानंतर ऊसाचा ट्रॅक्टर रस्त्यावरच उलटला. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.