BIG POLITICAL TURMOIL IN UP! 25 TO 26 SAMAJWADI PARTY MPs MAY SPLIT, BJP MAKES HUGE CLAIM saam tv
देश विदेश

ठाकरे गटानंतर आणखी एक मोठं 'ऑपरेशन'; २५ ते २६ खासदार फुटणार, देशाच्या राजकारणात खळबळ

Politics News : उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे २५ ते २६ खासदार भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचा दावा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केला आहे.

Bharat Jadhav

महाराष्ट्रात ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. युपीमधील समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. समाजवादी पक्षाचे अनेक खासदार आणि नेते भाजपमध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.

कानपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हा दावा केला आहे. समाजवादी पक्षाचे २५ ते २६ खासदार पक्ष बदलण्यास इच्छुक आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांनी पक्ष सोडला तर पक्षात मोठी फूट पडेल. दरम्यान टीएमसी (TMC) आणि शिवसेना या पक्षांमधील फुटीची उदाहरणे सर्वांसमोर आहेत. समाजवादी पक्षातही अशाच प्रकारची फूट पडण्याची शक्यता भाजप नेते वर्तवत आहेत.

भाजप समाजवादी पक्षात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीये, उलट २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका येईपर्यंत हे नेते स्वतःहूनच पक्ष सोडून बाहेर पडतील, असा दावा उपमुख्यमंत्री प्रसाद मौर्य यांनी केला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्र्यां आधी राज्य सरकारचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांनीही अशाच प्रकारची सोशल मीडिया पोस्ट केली होती. समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असून राम गोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एक पत्र सोपवले असल्याचं राजभर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.

खाणकाम आणि गोमती रिव्हरफ्रंट घोटाळ्यांचा संदर्भ देताना राजभर म्हणाले की, या घोटाळ्यांमागील मुख्य सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण उत्तर प्रदेशला माहित आहे. कायदेशीर फास आवळला जात असल्याने समाजवादी पक्ष (SP) अस्वस्थ झाला आहे. पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत.या दाव्यावर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्षाचे आमदार माता प्रसाद पांडे यांनी लखनौमध्ये म्हटले की, ओम प्रकाश राजभर हे स्वतःच एक 'स्कॅम'आहेत. त्यांनी राज्यात हुकूमशाही असल्याचे आरोप केले.

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी केलेल्या दाव्यांवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी राजभर यांचा दावा फेटाळून लावलाय. समाजवादी पक्ष पूर्णपणे एकजूट असून मजबूत स्थितीत असल्याचे अखिलेश यादव म्हणालेत. तसेच, इतर पक्षांमधील नेत्यांना फोडणे ही भाजपची जुनी राजकीय खेळी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : स्किन ग्लोसाठी महागडे प्रोडक्ट्स कशाला फक्त झोप आहे गरजेची; किती तासांची झोप देईल चेहऱ्यावर ग्लो

Monday Horoscope: आजचा दिवस ठरवेल तुमचं नशीब! या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर; सोमवारचे खास राशीभविष्य

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

SCROLL FOR NEXT