UP Police Transfer News  AI Image
देश विदेश

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल, 10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलिस दलात खळबळ

UP Police Transfer News: उत्तर प्रदेशमध्ये १० आयपीएस आणि १८ पीपीएस अधिकाऱ्यांसह एकूण २८ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली.

Priya More

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार अनेक मोठे निर्णय घेत आहेत. सरकारने उत्तर प्रदेशातील पोलिस विभागात मोठा फेरबदल केला. १० आयपीएस आणि १८ पीपीएस अधिकाऱ्यांसह एकूण २८ पोलिस अधिकाऱ्यांच्या सरकारने तडकाफडकी बदल्या केल्या. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. बदल्यांच्या संदर्भात सरकारने नुकताच आदेश जारी केले आहेत.

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, अनेक अधिकाऱ्यांची एका पोलिस आयुक्तालयातून दुसऱ्या आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तर इतर पोलिस अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांमध्ये आणि पोलिस युनिट्समध्ये नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत २०२०, २०२१ आणि २०२२ च्या बॅचमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तर १८ पीपीएस अधिकाऱ्यांना जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ग्रामीण, शहरी, गुन्हे, वाहतूक आणि सुरक्षा यासह विविध पदांवर नियुक्त करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी पुनीत द्विवेदी यांची पोलिस मुख्यालयातून बदली करत लखनऊ पोलिस आयुक्तालयात अतिरिक्त पोलिस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नीतू यांची वाराणसी पोलिस आयुक्तालयातून गौतम बुद्ध नगर येथे, शिव सिंह यांची कानपूरमधून आग्रा येथे आणि अमित कुमावत यांची लखनऊ येथून गाझियाबाद पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.

पोलिस अधिकारी किरण यादव यांची लखनऊ पोलिस आयुक्तालयातून एएनटीएफ मुख्यालयात अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. पुष्कर वर्मा यांची प्रयागराज पोलिस आयुक्तालयातून फतेहगड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य यांची आग्रा येथून बदाऊन येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर, शैव्या गोयल यांची गौतम बुद्ध नगर येथून गाझियाबाद पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. भावरे दीक्षा अरुण यांची शहाजहानपूर येथून मेरठ पोलिस प्रशिक्षण शाळेत (पीटीएस) अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. माविस टॉक यांची सोनभद्र येथून लखनऊ पोलिस आयुक्तालयात अतिरिक्त पोलिस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grocery Price Hike : कांदा-साखर महागली, डाळी-तांदळाचे भावही वाढले; किराणा बाजारातील नवे दर वाचाच

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या माझ्यावर अन्याय....

'माझ्याशी संबंध चांगले ठेवा...' शिंदे सेनेच्या आमदाराच्या कथित कॉल रेकॉर्डिंगने जुन्नरमध्ये खळबळ

Diabetes : डायबिटीज असतानाही १०० वर्षे जगता येतं! फक्त 'ABCD' मंत्र पाळा; काय आहे हा फॉर्म्युला?

Indian Railways : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर! वंदे भारतमध्ये मिळणार खास सरप्राईज

SCROLL FOR NEXT