धावत्या रेल्वेत महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा उत्तरप्रदेश पोलिसांनी शुक्रवारी एन्काउंटर केला. अनिस रियाझ खान (वय 30 वर्ष) असं एन्काउंटर झालेल्या आरोपीचं नाव आहे. या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि 2 पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाले आहेत.
याशिवाय अन्य दोन आरोपी देखील जखमी झाले. त्यांना अटक करुन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ३० ऑगस्ट रोजी एका महिला पोलीस कॉन्स्टेबल शरयू एक्स्प्रेसमध्ये जखमी अवस्थेत आढळून आली होती. (Latest Marathi News)
बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या महिलेच्या अंगावर कपडे देखील नव्हते. प्रवाशांनी तातडीने या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिला पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं.
दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर महिलेने तिच्यासोबत घडलेला भयावह प्रसंग सांगितला. आरोपीचा आणि तिचा सीटवरून वाद झाला होता. या वादातून त्याने मारहाण करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असा जबाब तिने पोलिसांना दिला होता.
ही घटना समोर येताच परिसरातून मोठा संताप देखील व्यक्त करण्यात आला. कोर्टाने देखील या घटनेवरून पोलिसांवर (Police) चांगलेच ताशेरे ओढले होते. याप्रकरणी पोलिसांनी अनिस रियाझ खान याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती.
पोलिसांनी आरोपीला सरेंडर करण्याचं सांगितलं होतं. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. दरम्यान, आरोपी अनिस रियाझ खान आणि त्याचे अन्य साथीदार अयोध्येतील इनायतनगर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी परिसराला घेराव घालून त्याला सरेंडकर करण्यास सांगितलं. मात्र, आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अनिस रियाझ खान ठार झाला. या घटनेत तीन पोलिसही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.