Heart Attack News Saam TV
देश विदेश

Heart Attack News : पतीचा हार्टअटॅकने मृत्यू, मृतदेह पाहून पत्नीनेही संपवलं जीवन; ३ महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

Uttar Pradesh : त्यानंतर अभिषेकला रुग्णालयात ठेवून अंजली घरी आली होती. मात्र काही वेळातच अभिषेकचा मृत्यू झाला. मात्र याबाबत अंजलीला कुणीही काहीच सांगितलं नाही.

प्रविण वाकचौरे

Ghaziabad :

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधून एका हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोनेदेखील इमारतीवरुन उडी घेत जीवन संपवलं आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी प्रेमविवाह केला होता. गाझियाबादमधील वैशाली सेक्टर ३ परिसरात ही घटना घडली आहे.

अभिषेक अहिलवाली (वय 25 वर्ष) आणि अंजली अहिलवाली (वय 23 वर्ष) असं मृत पती-पत्नीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दोघेही फिरायला गेले होते. तिथेच अभिषेकची तब्येत अचानक बिघडली. त्यावेळी अंजलीने पतीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर अभिषेकला रुग्णालयात ठेवून अंजली घरी आली होती. मात्र काही वेळातच अभिषेकचा मृत्यू झाला. मात्र याबाबत अंजलीला कुणीही काहीच सांगितलं नाही.

सोमवारी रात्रीच अभिषेकचा मृतदेह रात्रीच्या वेळी घरी आणण्यात आला. त्यावेळी अभिषेकचा मृतदेह पाहून अंजलीला मानसिक धक्का बसला. अंजलीने कोणताही विचार न करता सातव्या मजल्यावरुन उडी घेतली. जखमी अंजलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंजलीच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर इजा झाली. आयसीयूमध्ये उपचार सुरु असतानाच मंगळवारी तिचाही मृत्यू झाला.

अभिषेक आणि अंजलीचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वीचा नोव्हेंबर २०२३ मध्ये दोघांचा प्रेमविवाह झाला होता. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघेही सर्वांसोबत मिळून मिसळून राहायचे. मात्र एकाएकी दोघांच्या मृत्यूने नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT