Noida Bus Accident Saam TV
देश विदेश

Bus Accident: धावत्या बसमध्ये चालकाला फिट, दुचाकीस्वारांना ५० फूट फरफटत नेलं; थरकाप उडवणारी घटना

Noida Bus Accident: अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना ग्रेटर नोएडा शहरातील दरकौर परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

Satish Daud

Uttar Pradesh Bus Accident

प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसच्या चालकाला अचानक धावत्या बसमध्येच फिट आली. बस वेगात असताना चालक अचानक बेशुद्ध पडला. ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. काहींनी बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत या बसने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली. या घटनेत दुचाकीवरील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडा शहरातील दरकौर परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने घटनेत बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

करण (वय २३ वर्ष,रा. सिकंदराबाद), सुशील (वय ३० वर्ष, रा. बुलंदशहर), बदन (वय २६ वर्ष रा. हाथरस) आणि कमलेश (वय ३३ वर्ष) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलंदशहर आगाराची बस ३० प्रवाशांना घेऊन नोएडाच्या दिशेने येत होती. बुधवारी दुपारी बस दरकौर परिसरातील रेल्वेपुलाजवळ आली असता, अचानक बसचालकाला फिट आली. काही कळण्याच्या आतच बसचालक बेशुद्ध झाला.

चालक बेशुद्ध होताच बसमधील प्रवाशांनी बस नियंत्रित (Bus Accident) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बसने समोरून जात असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली होती. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव दुचाकीस्वारांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT