Uttar Pradesh News Six Friends died in truck car accident muzaffarnagar shocking incident Saam TV
देश विदेश

Accident News: कारवरील नियंत्रण सुटलं अन् अनर्थ घडला; ऐन दिवाळीत ६ जिवलग मित्रांनी गमावला जीव, भयानक घटना

Satish Daud

Uttar Pradesh Accident News

संपूर्ण देशात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना उत्तरप्रदेशात एक भयानक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात ६ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुझफ्फरनगर परिसरात घडली.  

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता, की सहाही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. अथक प्रयत्नानंतर कटरच्या सहाय्याने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. ऐन दिवाळीत ६ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू (Accident News) झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिवम त्यागी, परश शर्मा, कुणाल शर्मा, धीरज, विशाल आणि त्याचा मित्र, अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहदरा परिसरातील रहिवासी होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते बाहेर फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी दिल्ली-डेहराडून महामार्गावर छपरजवळ त्यांच्या कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT