uttar pradesh news Minister Kaushal Kishore Bungalow Firing young man death latest marathi updates ssd92 Saam TV
देश विदेश

Shocking News: केंद्रीय मंत्र्याच्या बंगल्यात गोळीबार; तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती

Satish Daud

Minister Kaushal Kishore Bungalow Firing: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या बंगल्यात तुफान गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

पीटीआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, विनय श्रीवास्तव असं गोळी लागून मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लखनौ पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्र्याच्या बंगल्यात गोळीबार झाल्याचं कळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे लखनौचे (Uttar Pradesh) खासदार आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या बंगल्यात आज सकाळच्या सुमारास गोळीबार झाला.

या गोळीबारात विनय श्रीवास्तव या तरुणाचा मृत्यू झाला. हा गोळीबार नेमका कुणी आणि का केला? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. केंद्रीय मंत्र्याच्या बंगल्यात झालेल्या गोळीबाराची घटना (Crime News) शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लखनौ पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती लखनौचे डीसीपी राहुल राज यांनी दिली आहे. पोलिसांनी कौशल किशोर यांच्या बंगल्यातून एक बंदूक जप्त केली असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचंही राहुल राज यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT