Child Killed In Dog Attack Google
देश विदेश

Dog Attack: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, उत्तर प्रदेशमधील घटना

Child Killed In Dog Attack: कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.

Rohini Gudaghe

Uttar Pradesh News

शहरात नेहमीच भटके कुत्रे मोकाट फिरत असल्याचं दिसतं. या भटक्या कुत्र्यांनी हल्ले ( Dog Attack) केल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे, आपण ही घटना सविस्तर जाणून घेऊ या. (latest marathi news)

ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कुबी या गावात घडली आहे. पीडित मुलगा इयत्ता तिसरीत शिकत होता. या पीडित मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कुत्रे चावल्यामुळे त्याला जीव गमवावा (Child Killed In Dog Attack) लागला. दोन बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठ वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला

कुबी गावात शेतातून घरी परतणाऱ्या आठ वर्षीय शिववर कुत्र्यांनी हल्ला केला. शिवचे वडील सचिन कुमार शेतकरी आहेत. रविवारी सायंकाळी सचिनची पत्नी सीमा शेतात जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत त्यांच्या आठ वर्षीय मुलगा शीवही शेतात गेला होता.

शेतात गेल्यानंतर सीमा चारा कापण्यात व्यस्त झाली. शिव एकटाच घराकडे निघाला होता. घरी परतत असताना तो दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेताजवळ पोहोचला असता भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके (Uttar Pradesh News) तोडले. या हल्ल्यात शीव भयंकर जखमी झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

शीवच्या तोंडावर, डोक्यावर आणि पायाला खोल जखमा झाल्या होत्या. यात शिवाचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने शीवची आई चारा घेऊन दुसऱ्या रस्त्याने घरी परतली. परंतु तिला शीव घरात दिवला नाही. त्यामुळं तिने परिसरात शोधाशोध सुरू केली असता शेतात त्याचा रक्तबंबाळ मृतदेह (Child Killed) आढळून आला.

या घटनेमुळे मृत मुलाच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निरागस शीवला त्याचा जीव गमवावा लागला (Dog Attack News) आहे, त्यामुळं या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT