Bareilly Nainital Highway Accident:  Saam Tv
देश विदेश

UP Accident News: कार डंपरवर आदळल्यानं भीषण स्फोट, कारमधील 8 जणांचा होरपळून मृत्यू

Bareilly Nainital Highway Accident: कार डंपरवर आदळल्यानं भीषण स्फोट, कारमधील 8 जणांचा होरपळून मृत्यू

Satish Kengar

Bareilly Nainital Highway Accident:

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे भीषण अपघात झाला आहे. येथील भोजीपुरा हायवेवर रात्री अकराच्या सुमारास डंपर आणि कारमध्ये धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. ज्यात कारमधील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर डंपरचालकाने पाल काढला आहे.

मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार रात्री 11 वाजता बरेलीहून नैनिताल हायवेवरून बहेडीकडे जात होती. महामार्गावरील भोजीपुराजवळ अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून पलीकडे गेली. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरला कार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की डंपर आणि कारला आग लागली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारमध्ये आग लागल्यानंतर कोणालाही कारमधून बाहेर पडता आले नाही, असं सांगितलं जात आहे. ही कर सेव्हन सीटर होती. याच मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिस आणि अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कार आणि डंपरमधील आग विझवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतांची संख्या आठ असल्याचे सांगितले आहे.  (Latest Marathi News)

लग्न समारंभासाठी बुक करण्यात आली होती कार

कारच्या क्रमांकावरून वाहन बहेरीच्या रामलीला मोहल्ला येथील रहिवासी सुमित गुप्ता यांचे असल्याची माहिती मिळाली आहे. ही कार नारायण नागला गावातील फुरकानने बुक केली होती. ही कार एका लग्न समारंभासाठी बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्न समारंभ आटोपून परतत असताना डंपर आणि कार यांच्यात धडकल्याने स्फोट होऊन कार्ल भीषण आगा लागली. काही वेळातच कारमधील सर्व लोकांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली तेव्हा गाडीच्या आतील सगळ्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT