भाजपच्या आमदार अनुपमा जयस्वाल आगीत होरपळल्या.
अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या प्रतिक्रात्मक पुतळ्याचं दहन
आमदारांचं कपाळ आणि त्यांच्या केसाला आग लागली होती.
उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. विरोधकांचा निषेध करत असताना नगरच्या आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जयस्वाल या होरपळल्या आहेत. समजावादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत असताना त्या होरपळल्या आहेत. या घटनेवरून अखिलेश यादव यांनी ट्विट करत भाजपला कोपरखळी मारली आहे.
शनिवारी दुपारी २:२० वाजता जिल्हाधिकारी (डीएम) चौकात भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. आमदार अनुपमा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या प्रतिक्रात्मक पुतळ्याचं दहन केलं जात होतं. त्यावेळी भाजपच्या महिला आमदाराने पुतळ्याला आग लावण्यासाठी आगपेटीची काडी पेटवली. त्याचवेळी पुतळ्याच्या आत अचानक स्फोट झाला.
याप्रकरणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल राय यांनी सांगितलं की, पुतळ्यात कदाचित पेट्रोलचं प्रमाण जास्त असावं. त्यामुळे आगीचा भडका आमदारांच्या चेहऱ्यावर आला असावा. महिला आमदारांचं कपाळ आणि केसाला आग लागली होती. परंतु तेथील कार्यकर्त्यांनी लगेचच आग विझवली. महिला आमदाराला पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
महाराजा सुहेलदेव मेडिकल कॉलेजचे सीएमएस मदन मोहन मणी त्रिपाठी यांनी याप्रकरणी सांगितलं की, आमदारांना इमर्जन्सी विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कपाळावर ४.५ टक्के 'सुपरफिशियल बर्न इन्जरी' झाली आहे. डोक्यावरचे काही केसही जळाले आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.