Ayodhya ATS Action  Saam TV
देश विदेश

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी एटीएसची मोठी कारवाई; तीन संशयितांना अटक

Satish Daud

Ayodhya ATS Action

अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशातच यासोहळ्याआधी उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी शाखेने (ATS) मोठी कारवाई केली आहे. एटीएसने तीन संशयितांना अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिन्ही संशयित सुखा डंके, अर्श डल्ला टोळीचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्श डल्लाच्या टोळीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सध्या एटीएसकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. (Latest Marathi News)

ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी दोन तरुण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा (Police) कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याशिवाय एटीएसचे जवानही तैनात आहेत. सर्व सैनिकांकडे आधुनिक शस्त्रेही आहेत. यासोबतच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या नजरेतून कोणीही सुटू नये यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सरयू नदी आणि घाटांवर एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. अयोध्येत दाखल होणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी बार कोडिंगचा वापर केला जात आहे. कडेकोट रेल्वे सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी २५० पोलीस मार्गदर्शक तैनात करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT