Greater Noida Lift Accident Saamtv
देश विदेश

Greater Noida Lift Accident: बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळली; ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

UP Lift Accident Latest Update: या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चार मजूर हे बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Greater Noida Lift Accident: काही दिवसांपूर्वी ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळण्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. या दुर्घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. शहरात बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधल्या जात असलेल्या आम्रपाली ड्रीम व्हॅलीत ही दुर्घटना घडली आहे.

या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चार मजूर हे बिहारमधील विभूतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील किशनपूर ताभका गावातील एकाच परिसरातील रहिवासी होते.

एका पुतळ्याजवळ ही इमारत बांधली जात होती. यावेळी लिफ्ट मोठ्या उंचीवरून खाली पडली. अचानक लिफ्ट तुटली आणि खाली गेली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या घटनेत ठार झालेल्या कामगारांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT