mirzapur  Saam tv
देश विदेश

धाड धाड...! दिवसाढवळ्या वकिलाची गोळ्या झाडून हत्या; दुचाकीवरून हल्ला करून फरार

mirzapur shocking news : मिर्झापूरमध्ये दिवसाढवळ्या वकिलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून हल्ला करून हल्लेखोर फरार झाले.

Vishal Gangurde

मिर्झापूरमध्ये घडली धक्कादायक घटना

वकिलाची गोळ्या झाडून हत्या

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरमधून धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कटरा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कतवारूमध्ये दिवसाढवळ्या एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वकिलाच्या हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कटरा कोटवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कतवारूपूरमध्ये राहणारे राजीव सिंह उर्फ रिटू सिंह आज बुधवारी सकाळी घराबाहेर पडले. त्यानंतर दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. त्यांनी दोघांनी पिस्तुलातून वकिलावर गोळीबार केला. या गोळीबारात राजीव सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.

वकील राजीव सिंह यांच्या मृत्यूवरून उलटसुलट तर्क लढवले जात आहेत. पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी म्हटलं की, आम्ही घटनास्थळावरून सीसीटीव्ही तपासले. आम्हाला आरोपीची ओळख पटली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. राजीव सिंह यांची हत्या का केली, याचा पोलिसांकडून कसून तपास केला जाईल.

दोघांनी वकिलावर केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. आरोपींनी कट रचून वकिलाची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. हल्लेखोरांनी अगदी जवळ जाऊन वकिलाची हत्या केली. दुसरा आरोपी बाईकवर बसला होता. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर वकीलाजवळ गेले. हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर त्यांची दुचाकी सुरू होत नव्हती. काही वेळाने दुचाकी सुरू झाल्यानंतर दोघे घटनास्थळावरून फरार झाले.

दिवसाढवळ्या वकिलाची हत्या केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वकिलाच्या मृत्यूने त्याच्या कटुंबीयांकडून एकच आक्रोश व्यक्त केला जात आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून वकिलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer death: सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूला हार्ट अटॅक; 39 व्या वर्षी झालं निधन

अपघातग्रस्तांना वाचवायला पळाला अन् दुसऱ्या बसने उडवला, टोलनाका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

औषधं घ्यायची गरज नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

Maharashtra News Live Update: पेट्रोल,डिझेल दरात गेली दहा दिवसात सलग चौथ्यांदा वाढ,सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला काञी

Ladki Bahin Yojana: मे महिना संपत आला, लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT