Uttar Pradesh Lakhimpur Kheri accident साम टीव्ही मराठी
देश विदेश

Magic Van Accident : मॅजिक व्हॅनची ट्रकला भीषण धडक, ९ जणांचा जागीच मृत्यू, ४ जखमी

UP Road Accident: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भरधाव मॅजिक व्हॅनने ट्रकला धडक दिल्याने ९ जणांचा मृत्यू झाला. अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले.

Namdeo Kumbhar

Uttar Pradesh Lakhimpur Kheri accident Death Toll : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. लखीमपूर खेरी-बहराइच रस्त्यावर एका भरधाव मॅजिक व्हॅनने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात व्हॅनमधील ९ मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिक मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅजिक व्हॅनमध्ये आठ पुरुष आणि चार महिलांसह एकूण १२ जण प्रवास करत होते. हे सर्व मजूर होते आणि कामासाठी लखीमपूर खेरीला जात होते. पण रस्त्यातच काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सध्या जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. ख्याती गर्ग यांनी सांगितले की, या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे आणि अपघाताच्या कारणाचा तपास करण्याचे काम पोलीस करत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मॅजिक व्हॅनचा चक्काचूर झाला. जखमींना प्रथमोपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

एकत्र प्रवास, शिंदेसेना अस्वस्थ? ठाकरेंची उच्चस्तरीय चर्चेची गुगली

SCROLL FOR NEXT