Kannauj Railway Station Live Hindustan
देश विदेश

Kannauj Railway Station: कन्नौज रेल्वे स्टेशनच्या निर्माणाधीन इमारतीचा लेंटर कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेक मजूर दबले

Uttar Pradesh Kannauj Railway Station Lintel Collapse: कन्नौजमध्ये शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. रेल्वे स्थानकाच्या बांधकामाधीन इमारतीचा लेंटर अचानक कोसळला. यावेळी इमारतीखाली काम करणारे सुमारे २० ते ३५ मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सुशोभिकरणाच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली. रेल्वे स्थानकाच्या निर्माणाधीन इमारतीचा लेंटर अचानक कोसळला. यात २० ते ३५ जण दबले आहेत, तर १२ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीच्या लेंटर कोसळल्याची माहिती होताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकार घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले.

मदत आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळ गाठत ढिगाऱ्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, १२ मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित कामगारांची सुटका सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मदतकार्य अजूनही सुरू असून लवकरच इतर मजुरांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात येईल, अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

या दुर्घटनेत इतर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलीय. रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामादरम्यान ही दुर्घटना झाली. पोलीस आणि मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, लवकरच ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची माहिती घेत योग्य मदत करण्याचे निर्देश दिलेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींच्या करियरला कलाटणी मिळेल, वाचा राशीभविष्य

Comedian Actor Death: चित्रपटसृष्टीवर शोककळा, कॉमेडियन अभिनेत्याचं निधन

Maratha Reservation : कुणबी दाखले दिले, व्हॅलेडिटीचं काय? हैदराबाद GRवरून मराठा संघटनांमध्ये वाद? VIDEO

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

SCROLL FOR NEXT