Manasvi Choudhary
योगा शरीरासाठी फायदेशीर आहे. योगा केल्याने शारीरिक अनेक समस्या दूर होतात.
योगा केवळ शारीरिक आणि मानसिक नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
आजकाल महिला व पुरूषांना केस गळतीच्या समस्या उद्भवतात केसांच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही घरीचे ५ सोपे योगा करा
बालासन योगा केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते यासह केसगळतीची समस्या दूर होते.
सर्वांगासन हा आसन झोपून दोन्ही पाय ९० अंशात वर उचला. हातांनी कंबरेला आधार द्या आणि पाय सरळ वर करा. हा आसन केल्याने केस गळती थांबण्यासाठी मदत होते.
उत्तानासन योगामध्ये सरळ उभे राहून हळूहळू पुढे वाका आणि हातांनी पायाच्या अंगठ्याला स्पर्श करा किंवा हात जमिनीला टेकवा डोक्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.
पचन नीट न होणे हे देखील केस गळतीचे एक मुख्य कारण असते यासाठी तुम्ही वज्रासन हा योगा करू शकता. गुडघे दुमडून टाचांवर बसा. पाठ सरळ ठेवून हाताचे तळवे गुडघ्यावर ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.