UP Crime Saam tv
देश विदेश

Husband-Wife: नवरा बायकोमध्ये मध्यरात्री कडाक्याचं भांडण; बायको झोपायला गेली, नवऱ्यानं कात्री घेऊन केलं असं काही की..

UP Man Shaves Wifes Head for Defying Him: पतीच्या शिवीगाळ आणि मारहाणीला कंटाळून विरोध केल्यामुळे, विकृत पतीने आपल्या झोपलेल्या पत्नीचे केस कापून तिचे टक्कल केले.

Bhagyashree Kamble

पतीच्या शिवीगाळ आणि मारहाणीला कंटाळून विरोध केल्यामुळे, विकृत पतीने आपल्या झोपलेल्या पत्नीचे केस कापून तिचे टक्कल केले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील भदोही गावात घडली आहे. या घटनेनंतर महिला आपल्या माहेरी गेली आणि घडलेली सगळी माहिती आपल्या आईला दिली. नंतर तिने पोलीस ठाणे गाठत आपल्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच कठोर कारवाईची मागणी केली. सध्या आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

औरई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंजनी कुमार राय म्हणाले, ही धक्कादायक घटना २४ एप्रिल रोजी घडली आहे. भदोही येथील बडा सियूर या गावात हे जोडपं राहत होतं. राम सागर असं आरोपीचे नाव असून, बबिता असं पीडित महिलेचं नाव आहे. २४ एप्रिल रोजी या जोडप्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. रात्री १ वाजेपर्यंत दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं. भांडणात नवऱ्यानं बायकोवर हात उचलला आणि शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

या गोष्टीला जेव्हा बायकोने विरोध केला, तेव्हा नवऱ्याला संताप अनावर झाला. त्याने बायकोला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर बायको झोपायला गेली. नवऱ्याच्या डोक्यात बायकोविषयी राग खदखदत होता. विकृत नवऱ्यानं रागाच्या भरात कैची घेतली आणि बायकोचे केस कापून टाकले. तसेच तिचं टक्कल केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना घडल्यानंतर बायको माहेरी गेली आणि आपल्या आईला सगळी घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आई आणि पीडित महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठले. तसेच तिनं विकृत पतीविरोधात तक्रार दाखल केली. यासह कठोर कारवाईची मागणी केली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT