Shocking Crime in Baghpat Saam Tv News
देश विदेश

जुगारात हरला, पैसे नसल्यानं पत्नीला ८ जणांच्या तावडीत दिलं, सासऱ्याकडूनही खूश करण्याची मागणी

Shocking Crime in Baghpat: बागपत येथे जुगारात हरल्यानंतर पतीनं पत्नीसोबत अत्याचार करण्याची परवानगी मित्रांना दिली. पीडितेकडून सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जुगारात हरल्यामुळे पतीने पत्नीला आपल्या मित्रांच्या स्वाधीन केलं आहे. पतीच्या ८ मित्रांनी आळीपाळीनं पीडितेवर बलात्कार केला, असा आरोप महिलेनं केला आहे. या प्रकरणानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात महिलेनं ८ पैकी ३ जणांना ओळखले आहे. तिघेही गाझियाबादचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

पीडितेचा विवाह २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मेरठमधील खिवई गावातील दानिश नावाच्या तरूणाशी झाला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या सुरूवातीलाच नवरा मद्यपी आणि जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. हुंडा मिळत नसल्यामुळे नवरा आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ केला जात होता.

एके दिवशी दानिश जुगार खेळत होता. जुगारात पती हारत होता. त्यानं उपस्थितीत मित्रांना पत्नीसोबत दुष्कर्म करण्याची परवानगी दिली. ८ जणांनी आळीपाळीनं पीडित महिलेवर बलात्कार केला. पीडितेनं तिच्या सासऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. हुंडाबद्दल छळ करून पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. 'जर तू हुंडा आणला नाहीस तर, तुला आम्ही जे काही सांगतो ते सर्व पाळावे लागेल.. तुम्हाला आम्हाला खूश करावे लागेल'.

गर्भवती राहिल्यानंतर सासरच्यांनी तिला गर्भपात करण्यास सांगितले. तिच्या पायांवर अॅसिडही ओतण्यात आले, असा आरोपही पीडितेनं केला. याच त्रासाला कंटाळून पीडितेनं माहेरच्या मंडळींना याबाबत माहिती दिली. तिनं पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस तक्रार दाखल केली. या प्रकरणी बिनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Crime: बहराइच हिंसाचारात रामगोपालची हत्या, सरफराजला फाशी; 9 जणांना जन्मठेप

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ फरार घोषित

Maharashtra Politics: पुणे-मुंबई-ठाण्यात महायुती तुटली? निवडणुकीआधीच ब्रेकअप?

Pune Crime: कोथरूड गोळीबार प्रकरण; पुण्यातील गुंड निलेश घायवळ फरार घोषित

Besan Vadi Recipe: मऊ, लुसलुशीत बेसनाची वडी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT