उत्तर प्रदेशाच्या हरदोईमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोचा अपघात झाला असून यात १० जणांचा मृत्यू झालाय. अनियंत्रित झाल्यानंतर ऑटो उलटला त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने ऑटोला चिरडलं. हा भीषण अपघात हरदोई जिल्ह्यातील कोतवाली बिलग्रामच्या रोशनपूर परिसरात झाला. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलंय.
तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार उलटलेल्या ऑटो रिक्षाला मागून घेणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली. या धडकेनंतर ऑटो हवेत उडला आणि दूर जाऊन जमिनीवर आपटला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो बिलग्रामकडे जात होता त्याच दरम्यान त्याचं चालकाचं ऑटोवरील नियंत्रण सुटले आणि उलटला. त्याचवेळी मागून येणारा ट्रकने ऑटोला चिरडलं. या अपघातानंतर चालक पसार झालाय.
या अपघाताचा तपास करणारे एसपी नीरज कुमार जादौन यांनी सांगितलं की, दुपारी साडेबारा वाजता अपघात झाल्याचं मिळाली. अपघातात जखमी झालेल्यां रुग्णालयात पाठवण्यात आले. ऑटोमध्ये १५ जण होते. या अपघातासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
प्रत्यक्षदर्शीच्या मते अपघातग्रस्त ऑटोमध्ये १५ प्रवाशी होते. हा ऑटो भरधाव जात होता,त्यावेळी अचनाकपणे उलटला. त्यानंतर मागून आलेल्या ट्रकने ऑटोला चिरडले. दरम्यान अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केलाय.
गुजरातमधील वासद येथे निर्माण होत असलेल्या पुलाचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडलीय. अपघातानंतर ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत एका मजुराचा मृत्यू झाला. पुलाच्या ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले होते. हा पूल बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग आहे. निर्माणाधीन असलेला हा पूल कोसळला. पुलाचे काम सुरू असताना अचानक पुलाच्या दगडाचा मोठा भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत काम करणारे ५ हून अधिक मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.