Assembly Elections 2022 Saam Tv
देश विदेश

Assembly Elections 2022: युपी, गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान दिग्गज मैदानात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक २०२२ (UP Assembly Election 2022) च्या दुसऱ्या टप्प्यात राज्यामधील ५५ जागांव्यतिरिक्त, गोवा (Goa Assembly Election 2022) आणि उत्तराखंडच्या (Uttarakhand Assembly Election 2022) सर्व विधानसभा जागाकरिता आज मतदान होत आहे. यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami), माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खान (Azam Khan) हे प्रमुख उमेदवार आहेत. गोवा विधानसभेच्या ४० जागाकरिता आज मतदान होत आहे, त्याकरिता सर्व तयारी करण्यात आली आहे. या जागाकरिता ३०१ उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत. गोव्यामध्ये यावेळी बहुकोणीय लढत होत आहे. आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC) आणि इतर लहान पक्ष राज्याच्या निवडणूक परिदृश्यावर छाप पाडण्याकरिता स्पर्धा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार की, कोविड-१९ चा प्रसार रोखण्याकरिता मतदान केंद्रांवर मतदारांना गोल्व्हज दिले जाणार आहे. महिला मतदारांच्या सोयीकरिता राज्यामध्ये १०० पेक्षा जास्त महिला मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. (Uttar Pradesh Goa Uttarakhand today Assembly Elections)

हे देखील पहा-

उत्तर प्रदेशामध्ये 55 जागांसाठी मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यामध्ये आज ९ जिल्ह्यांत ५५ जागांसाठी मतदान होत आहे. त्याकरिता सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका ७ टप्प्यांत प्रस्तावित आहेत. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहांपूर या ९ जिल्ह्यात विधानसभेच्या ५५ ​​जागाकरिता आज मतदान होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार की, कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका घेण्याकरिता सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.

उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागाकरिता सोमवारी होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उत्तराखंडमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. मतदानाकरिता ११,६९७ केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

या नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार

या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी सतपाल महाराज, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, धनसिंग रावत आणि रेखा आर्य यांच्याशिवाय भाजपच्या उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष मदन कौशिक हे महत्त्वाचे उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.

काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत, माजी मंत्री यशपाल आर्य, काँग्रेसच्या उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष गणेश गोदियाल आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांचा देखील समावेश आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ५७, काँग्रेसला ११, तर अपक्ष उमेदवारांनी २ जागा जिंकले होते.

हे प्रमुख उमेदवार आहेत ज्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार

गोव्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (GFP), सुदिन ढवळीकर (MGP), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि AAP चे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांचा देखील यामध्ये समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांनी निवडणूक अगोदरच युतीची घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी (AAP) स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

उत्तर प्रदेशात देखील मतदान

उत्तर प्रदेशमध्ये आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांपैकी २०१७ मध्ये भाजपने ३८ जागा जिंकले होते. सपाला १५ आणि काँग्रेसला २ जागा मिळाले होते. सपा आणि काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुका युतीने लढले होते. सपाने जिंकलेल्या १५ जागांपैकी १० जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी झाले होते.

या टप्प्यात रिंगणातील प्रमुख चेहऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा देखील समावेश आहे. जे भाजप सोडून सपामध्ये सामील झाले आहेत. आझम खान यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या रामपूर मतदारसंघातून तर सैनी नकुड विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना स्वार मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारीमध्ये मतदान झाले होते. १० मार्च दिवशी मतमोजणी होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT