Uttar Pradesh Ghaziabad Double Death Tragedy News Saam Tv
देश विदेश

Shocking : १३ व्या मजल्यावरून ज्योतिषाची आत्महत्या; पोलिसांनी घराचा दरवाजा उघडताच सापडला आईचा मृतदेह; नेमकं काय प्रकरण? वाचा

Uttar Pradesh Ghaziabad Double Death Tragedy News : गाझियाबादमध्ये ज्योतिषाने १३व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरात आईचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • गाझियाबादमध्ये ज्योतिषाने १३व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

  • घरात आईचा संशयास्पद मृतदेह आढळला

  • दोन्ही मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका उंच इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून ४० वर्षीय ज्योतिषीने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्याच्या राहत्या घरात त्याच्या आईचा संशयास्पद मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झियाबादच्या कवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजवीर नावाचे नामंकित ज्योतिषी आपल्या आईसोबत राहत होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास राजवीर यांनी उंच इमारतीच्या १३व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र खूप उंचावरून खाली पडल्याने राजवीर यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. काही तासांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी राजवीर यांच्या घरात पुरावे शोधण्यासाठी गेले असता त्यांना धक्कादायक चित्र पाहायला मिळालं.

पोलिसांना राजवीर यांच्या घरात ब्लँकेटमध्ये एका महिलेचा मृतदेह गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक अंदाजानुसार त्या महिलेचा मृत्यू २ दिवसांपूर्वी झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी राजवीर यांच्या शेजाऱ्यांची विचारपूस केली असता, ती महिला राजवीर यांची आई असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आधी आईचा मृत्यू नंतर ज्योतिषी मुलाची आत्महत्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या दोन्ही मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT