Uttar Pradesh Crime Saam Tv
देश विदेश

Crime: भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं; अडथळा ठरणाऱ्या सासूचा काटा काढला

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये महिलेने भाच्याच्या मदतीने सासूची हत्या केली. या दोघांचे प्रेमसंबंध होते. सासूने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. त्यामुळे महिलेने अडथळा ठरणाऱ्या सासूचा काटा काढला.

Priya More

Summary -

  • महिलेने विष देऊन केली सासूची हत्या

  • उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील घटना

  • अनैतिक संबंधांमुळे रचला हत्येचा कट

  • आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक

उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या या महिलेने सासूचा काटा काढला. मामीने भाच्याच्या मदतीने सासूला मारण्याचा कट रचला. तिने चपातीमध्ये विष टाकून सासूला खायला दिले. सासूची तब्येत बिघडून तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये खळबळ उडाली.

सासूच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी मामीला अटक केली. तर तिचा बॉयफ्रेंड भाचा सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. आरोपी महिलेचा नवरा मनोज रावतने सांगितले की, ५ एप्रिल रोजी जेवताना त्याच्या आईला चपाती कडू लागली. त्यामुळे जेवल्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिला प्रचंड उलट्या होऊ लागल्या. प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मनोजने पुढे सांगितले की, आईच्या मृत्यूनंतर घरामध्ये जेव्हा जेव्हा चपातीबद्दल चर्चा झाली तेव्हा त्याची बायको शालिनी वारंवार उडवाउडवीची उत्तरं देत होती. त्यानंतर घरामध्ये एका कागदामध्ये गुंडाळलेली चपाती सापडली तेव्हा त्याला संशय आला. त्यानंतर गावामध्ये पंचायत बोलावण्यात आली. त्याठिकाणी मनोजच्या नातेवाईकांनी सांगितले की, शालिनीने याआधी देखील किटकनाशक मागवले होते. शालिनीची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

शालिनीने सासूची हत्या करण्याच्या १० दिवसापूर्वी चहामध्ये विष मिसळून सासूला प्यायला दिला होता. पण तिच्या सासूने तो चहा फेकून दिला. त्यानंतर तिने विषारी पावडर चपातीमध्ये मिक्स करून सासूला खायला दिले त्यामुळे तिचा मृत्यू झाला. शालिनीने भाचा करणच्या सांगण्यावरून हे कृत्य केले होते. करण काही दिवसांपूर्वीच इराकवरून घरी परत आला होता. शालिनी आणि करण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक प्रचंड वाढली होती. जेव्हा सासूने या नात्याला विरोध केला तेव्हा दोघांनी तिच्या हत्येचा कट रचत तिला संपवलं. शालिनीच्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी करण आणि शालिनीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शालिनीला अटक केली असून फरार करणचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT