देश विदेश

Crime : खून का बदला खून से...! १४ वर्षानंतर बापाच्या हत्येचा घेतला बदला, धक्कादायक घटनेने गावात खळबळ

Uttar Pradesh Crime: शामलीमध्ये एका तरुणाने १४ वर्षांनंतर वडिलांच्या मृत्यूची बदला घेतला. त्याने ४५ वर्षीय व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली, पोलिस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू करत आहेत.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील मंगळुरा गावातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एका मुलाने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला. शनिवारी संध्याकाळी ३० वर्षीय राहुल नावाच्या तरुणाने ४५ वर्षीय जयवीर या व्यक्तीवर गोळी झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर राहूल घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, जयवीर शेतातील काम संपवून घरी जात असताना राहुलने त्याच्यावर अचानक गोळीबार केला. गोळी थेट जयवीरच्या डोक्यावर लागल्याने तो जागीच ठार झाला. गावकऱ्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोलीस तपासानुसार, या खुनामागे जुने दुश्मनी कारणीभूत असल्याचे कळाले. २०११ साली जयवीरने झिंझाना परिसरात राहुलच्या वडिलांची, ब्रिजपाल नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. या गुन्ह्यात त्याला ११ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. शिक्षा पूर्ण करून सुटल्यावर जयवीर गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गावात शांततेत राहत होता. मात्र त्याच्या जुन्या गुन्ह्याचा परिणाम इतक्या वर्षांनी पुन्हा समोर आला. राहुलने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेत जयवीरचा जीव घेतला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की आरोपी राहुल सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. जयवीरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावात आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

या हत्येचा बदला प्रकरणामुळे मंगळुरा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांपूर्वी भूतकाळात घडलेला एक गुन्हा पुन्हा एकदा हत्येच्या स्वरूपात समोर आल्याने समाजात संताप निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून आरोपीला लवकरच अटक होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

Forest Department Recruitment: खुशखबर! वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

SCROLL FOR NEXT