Prayagraj Crime News Saam tv
देश विदेश

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

Prayagraj Crime News : प्रयागराजमध्ये एका न्यूरोसर्जनवर उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • प्रयागराजमध्ये न्यूरोसर्जनविरोधात गैरवर्तनाचा आरोप

  • महिलेला अयोग्य स्पर्श केल्याची तक्रार

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास सुरू

  • घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

महाराष्ट्रात भोंदू खरात हे प्रकरण चर्चेत असताना प्रयागराजमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका न्यूरोसर्जनने उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. या डॉक्टरने महिलेला कपडे काढायला सांगून तिला अश्लील स्पर्श केल्याचा आरोप पीडितेने केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर डॉक्टरचे नाव न्यूरोसर्जन डॉ. कार्तिकेय शर्मा असे आहे. शर्मा याचे प्रयागराजच्या सिव्हिल लाइन्स भागातील क्लाइव्ह रोडवर स्वतःचे क्लीनिक आहे. पीडित महिलेला मायग्रेनचा आजार असल्याने उपचारासाठी तिच्या भावासोबत शर्माच्या क्लीनिकमध्ये आले होती. यादरम्यान ती आल्याचे पाहून शर्माने केबिनमधील सर्व पेशंटला बाहेर पाठवून सदर महिलेला आतमध्ये बोलावलं.

त्यानंतर डॉक्टरने केबिनचे दार आतून लावले आणि महिलेला तिचे कपडे काढायला लावले. तसेच तिची तपासणी करण्याच्या बहाण्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेनंतर महिलेने क्लिनिकमध्ये आरडाओरडा केला. त्यामुळे क्लीनिक बाहेर असलेल्या रुग्णांमध्ये खळबळ उडाली.

यानंतर महिलेची विचारपूस केली असता तिने केबिनमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल सर्वांना सांगितले. महिलेच्या भावाने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टर शर्मा विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याने डॉक्टरविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ७६ आणि १२७(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT