Uttar Pradesh Crime News SAAM TV
देश विदेश

Uttar pradesh Crime News: खळबळजनक! रोजच्या छेडछाडीला कंटाळली, युवकाला घरी बोलावून महिलेने केलं भयकंर कृत्य

Uttar pradesh Crime News: उत्तर प्रदेशच्या कौशंबी येथे छेडछाडीला कंटाळलेल्या महिलेने युवकाचं गुप्तांग कापल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे.

Vishal Gangurde

Uttar pradesh Crime News:

उत्तर प्रदेशातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. उत्तर प्रदेशच्या कौशंबी येथे छेडछाडीला कंटाळलेल्या महिलेने युवकाचं गुप्तांग कापल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशच्या मंझनपूरच्या माखूपूर गावात ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मीडियावर वृत्तानुसार, छेडछाडीला कंटाळलेल्या महिलेने युवकाला घरी बोलावून त्याचं गुप्तांग कापल्याची घटना घडली आहे. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला आहे. या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या युवकाची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर महिला घटनास्थळावरून फरार झाली आहे.

छेडछाडीने कंटाळलेल्या महिलेने या युवकाला मंगळवारी सायंकाळी घरी बोलावलं. युवक महिलेवर विश्वास ठेवून तिच्या घरी गेला. त्यानंतर महिलेने युवकावर धारदार हत्याराने हल्ला केला. त्यानंतर महिलने या युवकाचं गुप्तांग कापून त्याला जखमी केलं. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युवकाने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. त्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या जखमी युवकाची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे. '

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेच्या विरोधात तक्रार दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT