Uttar Pradesh Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : सासू सासऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन सून प्रियकरासोबत फरार; दागिनेही केले लंपास

सासू आणि सासऱ्यांना चहातून झोपेच्या गोळ्या देऊन एका सूनेनं प्रियकरासोबत धूम ठोकली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Crime News : मागील काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना (Crime News) समोर आली आहे. सासू आणि सासऱ्यांना चहातून झोपेच्या गोळ्या देऊन एका सूनेनं प्रियकरासोबत धूम ठोकली आहे. जाताना तिने लाखों रुपयांसह दागिन्यांवरही डल्ला मारला.

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील शाहजहांपूरमधून समोर आला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासू सासरे, तसेच पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचे दागिने आणि 50 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.

नेमकं काय घडलं?

शोभा असं आरोपी पत्नीचं नाव असून तीन वर्षापूर्वी शोभाचे लग्न कांत नगरातील विकास राठोड या तरुणाशी झाले होते. त्यांना दोन वर्षाची मुलगी देखील आहे. जलालाबाद येथील रहिवासी असलेल्या शोभाचे बारावीत असताना, एहसानला नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. जवळपास 2 वर्षे शोभा आणि एहसानमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते.

हा प्रकार शोभाच्या घरच्यांना समजल्यानंतर तिचा विवाह कांत नगरातील विकास राठोड याच्याशी लावून देण्यात आला. यादरम्यान त्यांना एक मुलगीही झाली. मात्र, लग्न होऊनही शोभाचे एहसानसोबतचे प्रेमसंबंध संपले नाहीत. ती त्याच्याशी मोबाईलवरून बोलायची. दरम्यान, सासरच्या मंडळींनाही शोभाच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला चांगलंच सुनावले होते.

मात्र, याचा काहीही परिणाम शोभावर झाला नाही. तिने प्रियकरासोबत पळून जाऊन सेटल होण्याचा निर्णय घेतला. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने नशेच्या गोळ्या चहामध्ये मिसळून सासू, पती व सासऱ्याला दिल्या. त्यामुळे सर्वजण बेशुद्ध पडले. यानंतर तिने रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. या घटनेची मोठी चर्चा होत आहे. सध्या शोभा आणि तिचा प्रियकर एहसान पोलिसांच्या ताब्यात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा विधेयकाविरोधात शिवाजी पार्कात आंदोलन

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

SCROLL FOR NEXT