Uttar Pradesh Lawyer End Life Saam Tv
देश विदेश

Shocking: न्यायालयातच वकिलाची आत्महत्या, ५ व्या मजल्यावरून मारली उडी; सुसाईड नोट सापडली

Uttar Pradesh Lawyer End Life: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये वकिलाने आत्महत्या केली. न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून त्याने उडी मारत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • कानपूर न्यायालयात वकिलाची आत्महत्या

  • न्यायालय परिसरात खळबळ

  • पाचव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

  • सुसाईड नोटमध्ये मानसिक छळाचा उल्लेख

उत्तर प्रदेशमध्ये एका वकिलाने आत्महत्या केली. न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून त्याने उडी मारत आयुष्य संपवलं. कानपूरमध्ये गुरूवारी ही घटना घडली. या वकिलाने व्हॉट्सअपवर दोन पानांची पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्याने आत्महतया केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, आतापर्यंत माझ्यासोबत जे घडले ते पाहता मला वाटत नाही की हे आयुष्य जगण्यात काही अर्थ आहे.'

पोलिसांनी सांगितले की, प्रियांशु श्रीवास्तव नावाच्या एका वकिलाने न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारली. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. या घटनेनंतर न्यायालयाच्या परिसरात गोंधळ उडाला आणि मोठ्या संख्येने वकील घटनास्थळी जमले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळी सील करण्यात आला.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रियांशूने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर दोन पानी सुसाईड नोट शेअर केली होती. त्या सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले होते, 'माझी शेवटची इच्छा आहे की सर्वांनी ही सुसाईड नोट शेवटपर्यंत वाचावी. मी प्रियांशू श्रीवास्तव, वरुण विहार, बर्रा-८, कानपूर येथील रहिवासी आहे. आज, २३ एप्रिल रोजी दुपारी अंदाजे १२:०५ वाजता मी कोणत्याही दबावाशिवाय किंवा जबरदस्तीशिवाय पूर्ण शुद्धीत असताना ही सुसाईड नोट लिहून माझे जीवन संपवत आहे. मी एक नोंदणीकृत वकील असून मी २०२५ मध्ये कानपूर नगर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. वेळेअभावी मी उत्तर प्रदेश बार काऊंसिल, प्रयागराज येथून माझी नोंदणी मिळवू शकलो नाही.'

त्याने पुढे लिहिले, 'ही कहाणी माझ्या बालपणात सुरू होते. मी सुमारे ६ वर्षांचा असताना मी फ्रिजमध्ये ठेवलेला आंब्याचा रस प्यायलो आणि मला नग्न करून घरातून हाकलून देण्यात आले. प्रत्येक मिनिटाला माझ्याकडे संशयाने पाहणे, प्रत्येक मिनिटाला हिशोब मागणे. हा मानसिक छळ आहे. माझ्या हायस्कूलचा निकाल लागण्यापूर्वी, माझ्या वडिलांनी धमकी दिली होती की, जर मला कमी गुण मिळाले, तर ते मला नग्न करून घरातून हाकलून देतील. रोज वेदनादायी मृत्यू मरण्यापेक्षा एक दिवस मरणे लाखो पटीने चांगले आहे. माझे सर्व पालकांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या मुलांना तेवढाच छळावं जेवढं ते सहन करू शकतील. माझी विनंती आहे की, माझ्या वडिलांनी माझ्या मृतदेहाला स्पर्शही करू नये. मी हरलो, माझे वडील जिंकले. लव्ह यू, मम्मी...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Mumbai : धक्कादायक! केईम हॉस्पिटलमध्ये रूग्णाने केली आत्महत्या, हादरवणारे कारण आले समोर

विधानपरिषदेत शिंदेसेनेला 2 जागा; विदर्भातून या नावाची चर्चा, कुणाला मिळणार संधी?

Mumbai Marathi Row: मुंबईत मराठीवरून राडा! शिंदेसेनेच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक, गाडीच्या चाकाची हवा काढली, नेमकं झालं काय?

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

SCROLL FOR NEXT