VARANASI NURSING STUDENT DEATH: 20-YEAR-OLD STUDENT DIES AFTER ALLEGEDLY CONSUMING CONTRACEPTIVE PILLS GIVEN BY BOYFRIEND Saam Tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या; अतिरक्तस्राव झाला अन् भयंकर घडलं

Uttar Pradesh Crime News : वाराणसीच्या अकथा परिसरात २० वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बॉयफ्रेंडने दिलेल्या गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • २० वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

  • बॉयफ्रेंडने दिलेल्या गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर मृत्यू

  • पोलिसांनी संशयित बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले

  • सखोल चौकशी सुरू आहे

Uttar Pradesh Nursing Student Death News उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील अकथा परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाऊन एका नर्सिंगच्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे या गोळ्या तिच्या बॉयफ्रेंडने दिल्याची माहिती आहे. विद्यार्थिनीचा मृतदेह बॉयफ्रेंडच्या पीजी रूमच्या बाहेर जिन्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकथा भागात घडली. विद्यार्थिनी आणि तिचा बॉयफ्रेंड हे दोघेही एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. संबंधित तरुण पीजीमध्ये राहत होता आणि विद्यार्थिनी त्याला अनेकदा भेटण्यासाठी तेथे जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मृत विद्यार्थिनीचे वडील राज्य पोलिस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनी तिच्या आईसोबत सारनाथ पोलीस वसाहतीच्या बिल्डिंगमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी तिने घरून दोन डबेही तयार केले होते, अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार,संबंधित विद्यार्थिनीच्या बॉयफ्रेंडने तिला गरोदर राहिल्याने तिला गर्भनिरोधक गोळी खाण्यासाठी दिली. यामुळे तिची तब्बेत बिघडली. तिला अतिरक्तस्राव झाल्याने ती बॉयफ्रेंडच्या पीजी रूमबाहेरील जिन्यात बेशुद्ध झाली.

या प्रकरणाबाबत माहिती देताना एसीपी सारनाथ विदुष सक्सेना यांनी सांगितले की, विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT