23-Day-Old Baby Found Dead in Bed Saam
देश विदेश

पालकांच्यामध्ये २३ दिवसांचं बाळ झोपलं; कूस बदलली अन् बाळाचा गुदमरून मृत्यू, आईनं फोडला टाहो

23-Day-Old Baby Found Dead in Bed: उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये २३ दिवसांच्या नवजात बाळाचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे रविवारी रात्री उशिरा घडलेल्या एका ह्रदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. २३ दिवसांच्या एका नवजात बाळाचा पलंगावर झोपताना गुदमरून मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, बाळ आपल्या पालकांसोबत झोपला होता. मात्र, झोपेतच कुणाचा तरी हात किंवा शरीराचा काही भाग नवजात बाळाच्या अंगावर पडला. यामुळे बाळाचा श्वास रोखला गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी बाळाला मृतावस्थेत पाहून आईला जबर धक्का बसला. त्यांनी तातडीने बाळाला रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून मुलाला मृत घोषित केलं. पती आणि पत्नीनं रूग्णालयात एकच टाहो फोडला. दरम्यान, रूग्णालयातच पती आणि पत्नीने एकमेकांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला. तसेच भांडणे देखील सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे परिवार अमरोहाच्या गजरौला परिसरातील सिहाली जागीर गावात वास्तव्यास होते. लग्न झाल्याच्या ४ वर्षांनंतर या जोडप्याला मुल झाले होते. मात्र, अवघ्या २३ दिवसांनंतर बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हा दुर्देवी घटनेनंतर, कुटुंब असह्य झाले आहे. आई आणि तिच्या मुलाचे कपडे आणि खेळणी पाहून वारंवार अश्रू ढाळते आहे.

सीएचसी प्रभारी यांच्या मते, प्राथमिक तपासात नवजात बाळाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे उघड झाले. त्यांनी असेही सांगितले की, कुटुंबाने कुणाविरूद्धही तक्रार दाखल केली नाही, त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. या घटनेनंतर ग्रामस्थांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT