Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : ३२ वर्षीय महिलेकडून अल्पवयीन मुलाचं अपहरण; हॉटेलवर केला अत्याचार, हादरवून टाकणारी घटना

एका ३२ वर्षीय महिलेनं १७ वर्षीय मुलाचे अपहरण करत त्याच्यावर बलात्कार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Crime : देशात एकीकडे महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत असताना, दुसरीकडे उत्तरप्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय महिलेनं १७ वर्षीय मुलाचे अपहरण करत त्याच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिन्यांनंतर संशयित महिलेला अटक केली आहे. उत्तरप्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही चित्रकूट (Uttar Pradesh) जिल्ह्यातील राजापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रगौली परिसरात राहते. ऑक्टोबर २०२२ मध्ये या महिलेने घराशेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला.

दरम्यान, मुलाच्या अपहरणाची तक्रार  (Crime News) कुटुंबीयांनी पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सदरील मुलाचा तपास सुरू केला होता. यावेळी मुलगा हा प्रयागराज येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतलं.

पोलीस येत असल्याचं कळताच आरोपी महिलेने पळ काढला होता. आता दोन महिन्यानंतर या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेनं आपल्याला वेगवेगळे अमिष दाखवून तसेच फूस लावून पळवून नेलं होतं, असा जबाब १७ वर्षीय मुलाने पोलिसांना दिला आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रीय पातळीवरील 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

Milk Malai Benefits For Skin: दुधाची साय चेहऱ्याला लावा, कोरडी त्वचा होईल मऊ अन् मुलायम

'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT