Husband-Wife  google
देश विदेश

Shocking: हुंडा प्रकरणात तडजोड केली नाही, नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; बायकोचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकले

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आपल्या बायकोचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. हुंडा प्रकरणात बायकोने तडजोड करायला नकार दिला त्यामुळे नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या.

Priya More

Sammary:

  • उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने सर्व मर्यादा ओलांडल्या

  • हुंडा प्रकरणात तडजोड केली नाही त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले

  • आरोपीने बायकोचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली. हुंड्याशी संबंधित प्रकरणात तडजोड करायला बायकोने नकार दिल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने भयंकर कृत्य केले. नवऱ्याने बायकोवर दबाव आणण्यासाठी फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले आणि तिचे अश्लिल फोटो शेअर केले. ऐवढ्यावर न थांबता आरोपीने बायकोच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी बायकोची बहीण, वहिनी आणि आत्याचे फोटो देखील फेसबुकवर शेअर केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजरौला पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेचे लग्न २६ एप्रिल २०२१ रोजी हबीबगंजमधील पुरणपूर येथे राहणाऱ्या सुनील कुमार या तरुणासोबत झाले होते. महिलेचा आरोप आहे की, लग्न झाल्यापासून तिचा पती सुनील आणि कुटुंबीय हुंड्यासाठी माझा छळ करत आहेत. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी तिच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून लावले.

या घटनेनंतर पीडित महिलेच्या वडिलांनी गजरौला पोलिस ठाण्यामध्ये हुंड्यासाठी छळ केला जात असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तेव्हापासून ती तिच्या पालकांच्या घरी राहत आहे. पीडित महिलेने सांगितले की हुंड्याचा खटला दाखल झाल्यापासून माझा नवरा सुनील मला वारंवार फोन करून तोडगा काढण्यासाठी दबाव आणत होता. जर मी असे केले नाही तर माझे अश्लील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली होती.

बायकोने नकार दिल्यानंतर नवऱ्याने बनावट फेसबुक आयडी तयार करून तिचे अश्लील फोटो शेअर केले. आरोपीने बायकोची वहिनी, बहीण आणि आत्याचे फोटो देखील पोस्ट करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेला ६ नोव्हेंबर रोजी फोटोंबद्दल कळाले. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी महिलेला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

त्यानंतर पीडित महिलेने तिच्या नवऱ्याला फोन केला तेव्हा तो तिच्याशी गैरवर्तन करू लागला. तो तिला म्हणाला की, 'जोपर्यंत तू सहमत होत नाहीस तोपर्यंत मी असे फोटो प्रसारित करत राहील.' नवऱ्याच्या या कृत्यमुळे पीडित महिला मानसिक तणावात आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात अमली पदार्थांची वाहतूक, 24 किलो गांजा जप्त

China Sees Rising Trend: चीनमध्ये अंत्यसंस्कारानंतर राख समुद्रात टाकण्याचा ट्रेंड का?

Bihar Election: भाजपच्या लाटेत अजितदादांचा सुपडासाफ; अनेकांचे डिपॉझिट जप्त

गरिबांच्या पैशांवर अधिकाऱ्यांचा डोळा, घरकुल मंजुरीसाठी आदिवासींकडून पैशांची मागणी, व्हिडिओ

VIDEO: जाळ्यात अडकला, पण एका मिनिटात निसटला; बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

SCROLL FOR NEXT