Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: वडिलांच्या मित्राचं सैतानी कृत्य! लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची गळा आवळून हत्या

Kanpur Crime News: कानपूरच्या महाराजपूरमध्ये २७ जानेवारीला एक १२ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. वडिलांच्या मित्रानंच लैंगिक अत्याचार करून हत्या केली. या घटनेनंतर महाराजपूर हादरलं.

Bhagyashree Kamble

आधी लैंगिक अत्याचार केला. नंतर अल्पवयीन मुलीनं ओळखल्यामुळे आरोपीनं मुलीची गळा आवळून हत्या केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. बेंझिडाइन चाचणीच्या आधारे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. हे संतापजक कृत्य मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच केली असल्याचं उघड झालं. या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकण्यात आले आहेत.

कानपूरच्या महाराजपूरमध्ये २७ जानेवारीला एक १२ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात कुटुंबियांनी दाखल केली होती. बेपत्ता झाल्याच्या ३ दिवसानंतर तिचा मृतदेह झुडपात सापडला. ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला, नंतर तिची हत्या करण्यात आली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

या घटनेबाबत माहिती देत डीसीपी श्रवण कुमार म्हणाले, अल्पवयीन मुलगी शेळ्या घेऊन शेतात गेली होती. मात्र, घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आले की, एक शेळी गायब आहे. त्याच एक शेळीच्या शोधात ती पुन्हा शेतात गेली, मात्र पुन्हा परतलीच नाही. नंतर मुलीच्या कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर मुलीच्या वडीलांच्या मित्रावर पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी आरोपी मुलीच्या वडीलांचा मित्र अर्थात उदयभानच्या कपड्यांची बेंझिडाइन चाचणी केली. तेव्हा आरोपीनं गुन्हा कबूल केला. आरोपीनं सांगितले, 'जेव्हा मुलगी शेळी शोधायला गेली होती, तेव्हा मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीनं मी वडीलांचा मित्र असल्याचं ओळखलं. वडीलांना याची माहिती देईन असं तिनं सांगितलं. यामुळे मुलीची गळा आवळून हत्या केली'. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर कोर्टात नेऊन शिक्षा दिली जाईल असं डीसीपींनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT