uttar pradesh crime Bride Absconding With Her Boyfriend After Marriage seven day Saam tv
देश विदेश

Shocking News: धुमधडाक्यात लग्न लागलं, नववधू माहेरी गेली अन् परतलीच नाही; सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले

Bride Absconding With Her Boyfriend: सात दिवसांनी नववधू माहेरी गेली. तिथे गेल्यानंतर ती बाजारात जाऊन येते असं सांगून घराबाहेर पडली. मात्र ती परतच आली नाही.

साम टिव्ही ब्युरो

Bride Absconding With Her Boyfriend: थाटामाटात लग्न लागलं. नवरीला घेऊन नवरदेव घरी आला. दोघांकडील सत्यनारायणाची पूजा देखील पार पडली. घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्नानंतर (Wedding) सात दिवसांनी नववधू माहेरी गेली. तिथे गेल्यानंतर ती बाजारात जाऊन येते असं सांगून घराबाहेर पडली. मात्र ती परतच आली नाही. घरच्यांनी भरपूर शोधाशोध घेतली मात्र, तिचा थागपत्ता लागला नाही.

दरम्यान, मुलीची काळजी वाटू लागल्याने कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी नववधूचा शोध घेतला असता, चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. लग्नानंतर नववधू तिच्या प्रियकरासोबतच पळून गेल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर ती घरातील दागिने आणि रोख रक्कमही घेऊन गेली.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नवविवाहित तरुणी लग्नानंतर प्रियकरासह पळून गेली. तरुणीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, तरुणाने तिला फूस लावून पळवून नेलं. याप्रकरणी नववधूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून नववधूचा शोध सुरू केला आहे.

पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 31 मे 2023 रोजी त्यांनी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. 6 जून रोजी मुलगी माहेरी परतली. त्यानंतर 11 जून रोजी ती वस्तू घेण्याच्या बहाण्याने बाजारात गेली आणि परत आलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला.

त्यानंतर मुलगी प्रियकरासह पळून गेल्याचे वडिलांना समजले. यासोबतच घरातून रोख रक्कम आणि दागिनेही नेले आहेत. मुलीचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून मुलीच्या भावाच्या सासरकडील नातेवाईक आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस नवविवाहित महिलेचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी

Dolly Chaiwala: भाजपच्या प्रचारात डॉली चायवाल्याची झापूक- झुपूक एन्ट्री; Photos पाहा

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

SCROLL FOR NEXT