BJP MLA Slapped in lakhimpur Saam tv
देश विदेश

BJP MLA Slapped in lakhimpur : ...अन् पोलिसांसमोरच भाजप आमदाराला मारहाण, थेट थोबाडीत लगावली; नेमकं काय घडलं? VIDEO

BJP MLA Yogesh Verma News : पोलिसांसमोरच भाजप आमदाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांसमोर आमदाराला थोबाडीत लगावल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Vishal Gangurde

BJP MLA Yogesh Verma News :

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार योगेश वर्मा आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी बुधवारी मारहाण केली. आमदार योगेश वर्मा यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियाव व्हायरल होत आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीवरून दोघांमध्ये वाद झाला. बुधवारी या समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार होते.

समितीच्या निवडणुकीसाठी असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांची पत्नी पुष्पा सिंह या उमेदवार आहेत. भाजपचे आमदार योगेश वर्मा यांनी अर्जात हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. बुधवारी सकाळी भाजप आमदार आणि बार असोशिएशनचे अध्यक्ष आमने-सामने आले.

त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर बार असोशिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी थेट आमदार योगेश वर्मा यांना मारहाण केली. यावेळी त्यांनी आमदार वर्मा यांच्या कानशिलात लगावली. यावेळी उपस्थित पोलिसांनी तातडीने दोघांचे भांडण सोडवले. पोलिसांनी आमदार योगेश वर्मा यांना बाजूला नेलं.

अवेश सिंह यांनी मारहाण केल्यानंतर दुसऱ्या गटाने पुन्हा आमदार योगेश वर्मा यांना घेरून मारपीट सुरु केली. आमदार योगेश वर्मा यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना वेगळं केलं. पोलिसांनी मोठ्या अथक प्रयत्नाने आमदाराला त्यांच्या तावडीतून सोडवलं.

या मारहाणीच्या घटनेनंतर अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित आहेत. या बंकेच्या संचालक मंडळासाठी बुधवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या अर्जाच्या प्रक्रियेत हेराफेरी झाल्याचा आरोप आमदार योगेश वर्मा यांनी केला.

बार असोशिएशनचे अध्यक्षांच्या पत्नीने आमदारावर केला गंभीर आरोप

बार असोशिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांच्या पत्नी पुष्पा सिंह यांनी आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. ते नशेत असल्याचा आरोप पुष्पा सिंह यांनी केला. तसेच आमदारावर अर्ज फाडल्याचाही आरोप आहे. तसेच अनेकदा आमदारांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप पुष्पा सिंह यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Face Care: रात्री मेकअप रिमूव्ह न करता झोपल्यास काय होते?

GK: तुम्हाला माहितेय का? 'हा' एक देश एका दिवससाठी भारताची राजधानी बनले

Betrayal Indian history: एकाच्या दगाबाजीने बदलला देशाचा इतिहास; कोण होता तो गद्दार राजा?

SCROLL FOR NEXT