UP Election 2027 saam tv
देश विदेश

विधानसभा निवडणुकीआधीच आघाडीत बिघाडी; महत्वाची बैठक टळली

UP Elections 2027: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 आधीच काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीत जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसने 181 जागांची मागणी केल्याची चर्चा असून, प्रियंका गांधींकडे जागावाटपाच्या चर्चेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Omkar Sonawane

पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 मध्ये उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, काँग्रेस आणि भाजप उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी होणारी दोन्ही पक्षांची बैठक पुढे ढकलण्यात आलीय. दरम्यान काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेसाठी पाच सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली असून, या समितीची धुरा प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चाही आता सध्या तरी होणार नाहीये. सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची भेट झाली होती. या भेटीनंतर दोन्ही पक्षांची बैठक दोन ते तीन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत जागा वाटपासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीचे नेतृत्व प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आले आहे. या समितीमध्ये के.सी. वेणुगोपाल, युपी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आराधना मिश्रा, सहारनपूरचे खासदार इमरान मसुद यांचा देखील समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे जास्तीच्या जागा मागितल्या आहेत. समाजवादी पक्षाचे विद्यामान आमदार असलेल्या मतदारसंघावरही काँग्रेसने दावा केल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा पेच अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे तब्बल 181 जागांची मागणी केल्याची माहिती याआधी समोर आली होती. याच मागणीवरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा असून बहुमतासाठी 202 जागांची आवश्यकता आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 399 जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यापैकी 397 जागांवर पक्षाचा पराभव झाला होता. तब्बल 387 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॅाजीट जप्त झाले होते. पक्षाला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता, तर एकूण मतांची टक्केवारी 2.33 टक्के इतकी होती. त्यामुळे आता काँग्रेसच्या 181 जागांच्या मागणीवर समाजवादी पक्ष काय भूमिका घेणार आणि दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला कधी निश्चित होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! आता साखरेचे दर वाढले की शेतकऱ्यांनाही मिळेल फायदा; साताऱ्यातील बैठकीत काय ठरलं?

Maharashtra News Live Update: ऊसदरासाठी स्वाभिमानीचा एल्गार

Ajit Pawar: अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीचे CCTV फुटेज देण्यास पोलिसांचा नकार

हृदयद्रावक! मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावमध्ये हळहळ

Wedding Preparation Tip: लग्नाला फक्त काही दिवस उरलेत? नवरीने स्ट्रेस न घेता आवर्जून करा या ६ गोष्टी!

SCROLL FOR NEXT