THREE SISTERS MARRY ONE MAN IN AMROHA? VIRAL VIDEO SPARKS DEBATE, POLICE VERIFY CLAIMS  Saam Tv
देश विदेश

Viral News : अजब लग्नाची गजब गोष्ट! एकत्र राहण्यासाठी ३ सख्ख्या बहिणींनी एकाच नवरदेवाशी केला विवाह

Uttar Pradesh Sisters Wedding Viral Influncer News : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एकाच तरुणाशी तीन सख्ख्या बहिणींनी विवाह केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये एकाच तरुणाशी तीन सख्ख्या बहिणींनी विवाह केल्याचा दावा

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • तिन्ही बहिणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून त्यांचा नवरा कॅमेरामन आहे

उत्तर प्रदेशात घडणारे गुन्हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात सध्या एका लग्नाची चर्चा आहे. एका तरुणाने एकाच वेळी तीन बहिणींशी लग्नगाठ बांधली. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटलं ना? हे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर परिसरातील धौरिया गावातील सरोज, सावित्री आणि संतोष या तिघी बहिणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखल्या जातात. त्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर दररोज वेगवेगळ्या व्हिडिओ तयार करून मनोरंजन करतात. त्यांच्या व्हिडिओंचे चित्रीकरण करणारा विकास उर्फ विकू हा गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यासोबत कॅमेरामन म्हणून काम करत होता. चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि अखेर चौघांनी विवाहाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिन्ही बहिणी एकाच वेळी विकासच्या गळ्यात वरमाला घालताना दिसतात. त्यानंतर विकास तिन्ही बहिणींच्या भांगात सिंदूर भरतानाही दिसतो. हा विवाह १७ जुलै रोजी चामुंडा माता मंदिरात झाल्याचा दावा केला जात आहे. तिन्ही बहिणींनी एका व्हिडिओद्वारे हा निर्णय त्यांच्या स्वेच्छेने घेतल्याचे स्पष्ट केले आहे. लहानपणापासून त्या कायम एकत्र राहिल्या असून, लग्नानंतरही वेगळे राहायचे नव्हते. त्यामुळे एकाच व्यक्तीशी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. विकासनेही तिघींच्या इच्छेचा आदर करून हा निर्णय स्वीकारल्याचे म्हटले आहे.

हसनपूर कोतवालीचे प्रभारी राजेश कुमार तिवारी यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे. संबंधित विवाह प्रत्यक्षात झाला की तो केवळ व्हिडिओसाठी करण्यात आला होता, याची अद्याप खात्री झालेली नाही. तसेच, या संदर्भात कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नसून, तक्रार मिळाल्यास नियमानुसार चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा 7 विकेट्सने केला पराभव

Maharashtra News Live Update: रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट

नाशिकमधील परिस्थिती बिकट! गोदावरीने ओलांडली धोका पातळी; 'या' गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने खळबळ

ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा 'भाताचा फेसपॅक', कोरडी, रखरखीत त्वचा होईल मऊ- मुलायम

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर, ८० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र; तुमचं नाव यादीत आहे का?

SCROLL FOR NEXT