Damaged school buses after a head-on collision in Greater Noida. Saam tv
देश विदेश

भीषण अपघात! भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन स्कूल बसची समोरासमोर धडक, १२ विद्यार्थी जखमी

School Bus Accident: ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात दोन शालेय बसची धडक होऊन झालेल्या अपघातात डझनहून अधिक मुले जखमी झाली आहेत. बस चालकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे शालेय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

  • बसची समोरासमोर धडक

  • १२ हून अधिक विद्यार्थी जखमी

  • चालकाची प्रकृती गंभीर

ग्रेटर नोएडाच्या दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूपवास गावाजवळ आज सकाळी एक भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या दुसऱ्या स्कूल बसला धडक दिली. या दुर्घटनेत जवळपास १२ विद्यार्थी जखमी झालेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रूपवास गावाजवळील अमका रोडवर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. रामाज्ञा शाळेची असल्याचे मानली जाणारी एक बस भरधाव वेगात होती. याचदरम्यान चालकाचे बसच्या स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या जीझस मेरी स्कूलच्या बसला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बसेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. घटनेच्या वेळी जीझस मेरी स्कूलच्या बसमध्ये सुमारे २५ मुले होती. तर अनिंयत्रित झालेली दुसरी बस ही रिकामी होती.

अपघातानंतर मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावून आले. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले, त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. चालक बसच्या केबिनमध्ये अडकला होता, त्या मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार, बहुतेक मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे, परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे काहींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT