SONBHADRA WEDDING ACCIDENT: 3 DEAD, 9 INJURED IN PICKUP TRUCK TRAGEDY Saam Tv
देश विदेश

Accident News : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकपचा भीषण अपघात; ३ तरुणांचा जागीच मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

Uttar Pradesh Truck Accident News : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या पिकअपचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ३ तरुणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहेत.

Alisha Khedekar

  • लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा पिकअप ट्रक पलटी झाला

  • अपघातात ३ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

  • दोन जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर

  • प्रशासन व पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाला घेऊन जाणारा पिकअप ट्रक अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूर जिल्ह्यातील सेमरीबांध येथून एक लग्नाची वरात रामपूर बरकोनियाकडे जात होती. यावेळी रामपूर बरकोनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कथार गावाजवळ हा अपघात घडला. पिकअपमध्ये मोठ्या संख्येने वऱ्हाडी बसले होते. अचानक वाहनाचा ताबा सुटल्याने चालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही आणि पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी गाडीतून बाहेर फेकले गेले.

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून तातडीने लोधी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नऊ जण जखमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. उर्वरित सात जणांवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनही तत्काळ सक्रिय झाले. जिल्हाधिकारी गौर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांना जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आनंदाच्या क्षणी शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी मिडियम' मालिकेतली अभिनेत्री आहे प्रसिद्ध इन्फ्ल्यूएन्सर! इन्स्टाग्रामवर आहेत मिलियन फॉलोअर्स

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Navi Mumbai Airport: मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ५ मिनिटांत, काय आहे सरकारचा मास्टरप्लान?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा, कोणाचे कर्ज होणार माफ?

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' मराठीनंतर हिंदीतही १ नंबरवर! रितेश भाऊंनी रचला इतिहास, कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT